HW News Marathi
क्रीडा

कुस्तीपटू बजरंग पुनिया ६५ किलो गटात जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी

नवी दिल्ली | भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी आज (शनिवार) ६५ किलो वजनी गटात (वर्ल्ड रँकिंग) जागतिक क्रमवारीमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. बजरंग पुनिया यांनी कॉमनवेल्थ तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. बजरंग पुनिया हे भारतातील असे एकमेव कुस्तीपटू आहेत ज्यांचा जागतिक क्रमवारीच्या टॉप-१० मध्ये समावेश झाला आहे.

युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने कुस्तीपटूंच्या जागतिक क्रमवारीची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये बजरंग पुनिया यांना सर्वोच्च स्थान मिळाले आहे. याआधी ते दुसऱ्या स्थानावर होते. यावर्षी बजरंग पुनिया यांनी नुकत्याच बुडापेस्ट (हंगेरी) येथे आयोजित वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते. बजरंग पुनिया हे कुस्तूपटू योगेश्वर दत्त यांचे कोच आहेत.

Related posts

बांगलादेशचा पराभव करुन भारतीय क्रिकेट टीमची फायनलमध्ये धडक

News Desk

‘आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन’ शिवाजी पार्कमध्ये साजरा होणार…

News Desk

Asia Cup 2018 | विराट ऐवजी रोहित शर्मा करणार नेतृत्त्व

News Desk