HW News Marathi
Uncategorized

अक्षय कुमारने झाडला रस्ता

लखनौ – बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमारला उत्तर प्रदेशचा स्वच्छता दूत म्हणून नियुक्त केल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी जाहीर केले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अक्षय कुमार याने चक्क रस्त्याची झाडलोट करून स्वच्छतेबाबतची त्याची आत्मियता दाखविली.

उघड्यावर शौचाला जाण्या प्रतिबंध करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. यासाठी त्यांनी अक्षय कुमारची “ब्रॅंड ऍबेसिडरम्हणून नियुक्ती केली आहे. लखनौ येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनीच याबाबत घोषणा केली. यासंदर्भात अक्षय कुमारच्या येऊ घातलेल्या “टॉयलेट‘ या चित्रपटाची नायिका भूमी पेडणेकरहीकार्यक्रमाला उपस्थित होती. या वेळी अक्षय कुमारने आदित्यनाथ यांच्यासमोर “टॉयलेटमधील गाणेही गायले.

लखनौमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यांसह योगी आदित्यनाथ तो पाहणार असल्याचेही तसेच हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याची घोषणाही करण्यात आली. कार्यक्रमात अक्षय कुमारने शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छता राखण्याची शपथदिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पन्नास हजारात खरेदी केलेल्या तरूणीवर बाबाचा आठ महिने बलात्कार

News Desk

आजम खान यांची जयाप्रदावर अश्लील टीप्पणी, राष्ट्रीय महिला आयोगाने बजावली नोटीस

News Desk

निरव मोदींकडे पासवर्ड असल्याने मुंबईतील पंजाब नॅशनल बँक सील

News Desk