HW News Marathi
Uncategorized

उमेदवारीचा अर्ज अपूर्ण, गुलाबराव पाटलांनी खडसेंचा केला पाणउतारा

जळगाव | शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या सर्वपक्षीय बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर राजकारणाचा नवा अंक पाहायला मिळतोय. जळगाव भाजपच्या खासदार रक्षा खडसे व भाजपचे माजी आमदार स्मिता वाघ यांनी भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांना जाणीवपूर्वक फसवले, असा आरोप जिल्हा बँक निवडणूक अर्जावरून राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी केलाय. तर भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. यावरुन शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी रक्षा खडसे यांना जोरदार टोला लगावलाय. खासदाराला अर्ज भरता येऊ नये, याला काय म्हणावं, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

नेते एकनाथ खडसे हे बिनविरोध निवडून येणार

त्यामुळे एकंदरीतच जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसलाय. धरणगाव विकास सोसायटी मतदारसंघानंतर अमळनेर विकास सोसायटी, बोदवड आणि मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत. अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील हे बिनविरोध निवडून येणार आहेत. तर मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे बिनविरोध निवडून येणार आहेत.

दोघींनी जाणीवपूर्वक अर्ज अपूर्ण ठेवल्यानं त्यांचे अर्ज बाद

निवडणूक प्रक्रियेविरुद्ध बोलण्याऐवजी गिरीश महाजन यांनी आरोप करण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण करावे, असा टोला सतीश पाटील यांनी केलाय. खरंतर एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून अर्ज भरला होता. भाजप खासदार रक्षा खडसे आणि माजी आमदार स्मिता वाघ यांनी गिरीश महाजन यांना फसवलंय. दोघींनी जाणीवपूर्वक अर्ज अपूर्ण ठेवल्यानं त्यांचे अर्ज बाद झाले. रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांना भाजपकडून पुन्हा निवडणूक लढवायची असेल त्यामुळे त्यांनी महाजन यांच्या आदेशानं अर्ज दाखल केले असतील, असं सतीश पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेरीवाल्यांना हटवल्या प्रकऱणी मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक

News Desk

Chandrakant patil Vs Balasaheb Thorat | भाजप आणि कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली..

Arati More

कल्याणमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याची महिलेला मारहाण, CCTV

News Desk