HW News Marathi
Uncategorized

उल्हासनगरमध्ये राजकीय वैमनस्यातून तुफान हाणामारी

गौतम वाघ

उल्हासनगर – राजकारणाशी संबंध नसलेल्या परिवारातील पूजा कौर लबाना ही तरुणी राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडून आल्याच्या रागातून शीख समुदायाच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना काल रात्री उल्हासनगरात घडली आहे. नगरसेविकेच्या नातलगांना स्कार्पिओच्या धडकने गंभीर जख्मी करण्यात आले आहे. दोन्ही गटांच्या तलवारबाजीने कॅम्प 5 मच्छी मार्केट मध्ये तणावाचे वातावरण पसरले असून 11 जण जख्मी झाले आहेत. परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलिस ठाण्यात दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा कौर लबाना ह्या राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री यांच्या पॅनल मधून निवडून आल्या आहेत. याचा राग विरोधी गटाला आला होता. पूजा कौर यांच्या वडिलांचं मच्छी मॉर्केट मध्ये मटणाचे दूकान आहे. दुस-या गटाने काही दिवसां पूर्वी या मटणाच्या दुकानाला अडथळा होण्याच्या हेतुने चायनीज गाडी लावली होती. त्यातून वाद झाल्यावर त्याची तक्रार पूजा कौरच्या वडिलांनी केली असता, दुस-या गटावर गुन्हा दाखल झाला होता. याच रागातून काल रात्री पूजा कौर यांच्या नातलगांच्या अंगावर दुस-या गटाने स्कार्पिओ कार नेऊन त्यांना जख्मी केले. तसेच बेकायदेशीर जमाव जमवून आणि तलवार,चॉपरने चौघांवर वार केले. विशेष म्हणजे गंभीर जख्मीना शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आल्यावर तिथेही या गटाने राडा करण्याचा प्रयत्न करुन पोलिस,डॉक्टर यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी 15 जणांवर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दुस-या गटानेही पूजा कौर यांच्या नातलगांची तक्रार केली आहे. स्कॉर्पिओ गाडी मच्छी मार्केट मधून जात असताना गाडी थांबवून गाडीचे नुकसान करण्यात आले.असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान या दोन्ही गटाच्या दंगलीत 11 जण जख्मी झाले असून अटकसत्र सुरु असल्याची माहिती हिल लाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मोहन वाघमारे यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana | दावा केलेले लाभार्थी एच डब्ल्यूवर

Atul Chavan

अँमेझॉन देखील उतरणार सोशल मीडीया क्षेत्रात

News Desk

रेल्वेतील अन्न खरंच खाण्यायोग नाही

News Desk