HW News Marathi
Uncategorized

कांद्याचे दर गडगडले

लासलगाव : व्यापाऱ्यांनी थेट इजिप्तमधून कांदा आयात केल्यामुळे उसळलेले कांद्याचे भाव गेल्या आठवड्यापासून जोरदार गडगडले आहेत. शुक्रवारी येथील बाजारपेठेत कांद्याचा भाव क्विंटलमागे ४०० रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे आता सरासरी भाव २१०० रुपयांवर आले होते.

येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांदा आवक टिकून, बाजारभावात घसरण झाल्याचे चित्र आठवड्याअखेरच्या दोन दिवसांत दिसले. कांदा सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल या राज्यात व परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो व सिंगापूर इ. ठिकाणी मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात एकूण कांदा आवक ४६७०० क्विंटल झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान रु. ७०० ते २३५१,तर सरासरी २२५० प्रतिक्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक ३९०८५ क्विंटल झाली. उन्हाळ कांद्याचे भाव किमान ७०० ते २४५३, तर सरासरी २२५० पर्यंत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोबाइलवर 24 तास गेम खेळल्याने आले अंधत्व

News Desk

राहुल गांधीमुळे माझा मुलगा पायलट झाला

News Desk

Budget 2019 : पेट्रोल-डिझेल लीटरमागे १ रुपयांनी महागणार

News Desk