HW News Marathi
Uncategorized

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली

मुंबई – सुप्रसिद्ध सिनेअभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती चिंताजनक आहे. दोन दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. दिलीपकुमार 95 वर्षांचे असून, वयोमानामुळे त्यांच्यावर नवीन औषधांचा प्रयोग करणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांचा प्रॉसट्रेटचा विकार बळावत असल्याचेही डॉक्टर म्हणाले.

बुधवारी दुपारी त्यांना दिलीप कुमार यांना वाटू लागल्याने उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. वार्धक्यामुळे आलेल्या आजारपणांमुळे त्यांची प्रकृती वारंवार बिघडत असते. याआधी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ताप आणि पायाला सूज आल्याने लीलावती दाखल करण्यात आले होते.

दिलीप कुमार यांची कारकीर्द

दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ साली पेशावर (पाकिस्तान) येथे झाला. १९३०च्या दरम्यानत्यांचे वडिल लाला गुलाम सरवर हे आपल्या पत्नीसह सात मुलांना घेऊन मुंबईत स्थायिक झाले. बॉलीवूडचे शो मॅन राज कपूर आणि ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार हे बालपणापासून मित्र होते. या दोघांचेही कुटुंब पेशावर येथे राहणारे होते. या दोघांच्याही कुटुंबांमध्येही जवळचे संबंध होते. राज कपूर यांचे वडिल पृथ्वीराज कपूर हे सर्वात आधी मुंबईला आले होते.

ट्रॅजेडी किंग ही उपाधी लागलेल्या दिलीपकुमार यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीला ज्वार भाटा (१९४४) पासून सुरुवात केली. अंदाज (१९४९), दीदार (१९५१), आन (१९५२), देवदास (१९५५), मुगल-ए-आझम (१९६०),गंगा जमना (१९६१), मधुमती (१९५८), राम और श्याम (१९६७), आदमी (१९६८), गोपी (१९७०), बैराग (१९७६),शक्ती (१९८२) यासारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला किला हा त्यांचा शेवटचा चित्रपट. अभिनयासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी आठ वेळा पटकावला आहे. केंद्र सरकारने १९९४ साली त्यांना चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि अतुलनीय कारकीर्दीबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित केले. १९९८ मध्ये पाकिस्तान सरकारने त्यांना निशान-ए-पाकिस्तान हा पुरस्कार बहाल केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सामुहिक बलात्कार प्रकरणात, पाच पोलिस अधिकारी निलंबित

News Desk

विद्युत नियामक आयोगाला राज ठाकरेंनी लिहिले पत्र

swarit

नवाब मलिक हे एका चिडीतून सगळं करताय शिवसेना खासदार संजय राऊतांच वक्तव्य

News Desk