HW News Marathi
Uncategorized

जालना येथे सैन्य भरती

उत्तम बाबळे

नांदेड :- सैन्यभरती सोल्जर जीडी, सोल्जर टेक्रीकल, सोल्जर क्लार्क, एसकेटी व सोल्जर ट्रेडसमॅन या पदासाठी होत आहे. नांदेड जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी पात्रतेसंबंधी www.joinindianarmy या संकेतस्थळावरुन माहिती घ्यावी. ऑनलाईन अर्ज मंगळवार ११ एप्रिल २०१७ पर्यंत भरावेत. ऑनलाईन अर्ज भरणे झाल्यावर जिल्हा व तालुका भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

सैन्य भरती कार्यालय औरंगाबाद यांच्याकडून सैन्य भरतीचे आयोजन जालना येथे गुरुवार २७ एप्रिल ते रविवार ७ मे २०१७ या कालावधीत करण्यात आले आहे. ही सैन्य भरती नांदेड, हिंगोली, जालना, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, बुलढाणा व जळगाव या नऊ जिल्ह्यासाठी आहे.

पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनमान्य माजी सैनिक महामंडळ संचलित मेस्को करीअर ॲकडमी सातारा व बुलढाणा येथे अल्पदरात ६ हजार ५०० रुपयात एक महिन्याची ट्रेनींग दिली जाते. यामध्ये भोजन, निवास व ट्रेनिंग शुल्क समाविष्ट आहे. याचा युवकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर व्ही. व्ही. पटवारी यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे !

News Desk

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी लिपीक संवर्गीय प्रशिक्षणाची संधी

News Desk

धक्कादायक: तरूणीवर दोन दिवस सामूहिक बलात्कार

News Desk