HW News Marathi
Uncategorized

मुंबई, माझा तुझ्यावर भरोसा हाय, मलिष्काचा महापालिकेला पुन्हा फटका

मुंबईः बीएमसी, माझा तुझ्यावर भरोसा नाय, म्हणत महापालिका कारभाराचे वाभाडे काढणाऱ्या आरजे मलिष्काला अडचणीत आणण्याचा केविलवाणा प्रयत्न महापालिका तसेच शिवसेनेने चालवला आहे. मलिष्का राहत असलेल्या घरात डेंग्यूच्या अळ्यांची पैदास होत असल्याचा शोध महापालिकेच्या आरोग्य विभागाला लागला आहे. मलिष्कांने महापालिकेचे वाभाडे केल्यानंतरच डेंग्युच्या अळ्या कशा सापडल्या, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. मलिष्काच्या गाण्याने महापालिकेची बदनामी झाल्यामुळे आता मलिष्काची बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न महापालिकेने सुरू केली आहे. त्यातच काहींनी मलिष्काच्या रेडिओवर पाचशे कोटींचा दावा ठोकण्याची तयारी चालवली आहे. पाचशे कोटींचा दावा ठोकण्यासाठी महापालिकेला किमान पन्नास कोटी रुपये खर्च येणार आहे. तोच खर्च जर मलिष्काने मांडलेल्या समस्यांवर खर्च केल्यास महापालिकेची बदनामी टळेल शिवाय नागरिकांचा त्रासही कमी होण्याची शक्यता आहे. परंतु हे समजण्याची उमज शिवसेनला कधी येणार, आता शोधावे लागणार आहे.

दरम्यान, मलिष्काने या सर्व प्रकारावर बोलणे टाळले आहे. तिने मुंबई, माझे तुझ्यावर भरोसा हाय असे म्हणत पुन्हा महापालिकेला फटकारून काढले आहे. दरम्यान, शिवसेनेवर टिका करण्याची संधी शोधणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी मलिष्काला पाठिंबा दर्शविला आहे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लखीमपूर खेरी प्रकरणी प्रश्न विचारताच केंद्रीय मंत्री संतापले; पत्रकाराची पकडली कॉलर

News Desk

सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज नाही !

News Desk

संजय राऊत सपत्नीक शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर!

News Desk