HW News Marathi
Uncategorized

योजना, उद्दीष्टांच्या अंमलबजावणी नियोजन करा – खा.अशोक चव्हाण

उत्तम बाबळे

नांदेड :- योजना, उद्दीष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात यावेत, असे निर्देश माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे संपन्न झालेल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यातांना अध्यक्षीय समारोपात दिले आहेत.

जिल्ह्यातील विविध विकास योजना, तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. या

बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई निवृत्ती पवार, नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या महापौर शैलजा स्वामी, आमदार अमर राजुरकर, आमदार डी. पी. सावंत, आमदार वसंत चव्हाण, विविध पंचायत समितींचे सभापती नांदेड- सुखदेव जाधव, भोकर- झिमाबाई चव्हाण, लोहा- सतीश पाटील उमरेकर, नायगाव- श्रीमती वंदना पवार, देगलूर- शिवाजी देशमुख, मुखेड- अशोक पाटील, धर्माबाद- श्रीमती रत्नमाला कदम, अर्धापूर- श्रीमती मंगल स्वामी, हदगाव- श्रीमती सुनिता दवणे, हिमायतनगर- श्रीमती माया राठोड, माहूर- मारोती रेकुलवार, किनवट- श्रीमती कलावती राठोड, तसेच समिती सदस्य सुभाष पाटील दापकेकर, रामचंद्र मुसळे, ॲड नामदेव राणवळकर, समिती सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बी. एन. कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती.

बैठकीत सुरवातील 13 ऑगस्ट 2016 रोजी झालेल्या सभेच्या इतिवृत्ताचे वाचन व त्यास मान्यता देण्यात आली. तसेच सन 2016-17 वर्षातील मार्च 2017 अखेर व सन 2017-18 वर्षातील जुन 2017 अखेर योजनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दिनदयाळ अंत्योदय योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण, स्वच्छ भारत मिशन शहरी व ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, राष्ट्रीय भुमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, अमृत योजना, महावितरणची उज्ज्वल योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य मिशन, सर्व शिक्षा अभियान, महिला व बाल विकास योजना, शालेय व पोषण आहार योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, डिजिटल इंडियाअंतर्गत ग्राम पंचायत इंटरनेट सुविधा, रेल्वे, भारत संचार निगम लिमीटेड, राष्ट्रीय महामार्ग या योजनांच्या प्रगतीचा आढावाही घेण्यात आला. खा. चव्हाण यांनी विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावाणीसाठी संबंधित यंत्रणेने त्वरीत कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. केंद्र शासनाच्या नदी शुद्धीकरण योजनेतून मनपाने गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी पाऊल उचलावे. याबाबत पर्यावरण विभागाशी चर्चा करुन जिल्हाधिकारी यांच्या स्तरवर आढावा बैठक घेऊन वेळेत कार्यवाही पूर्ण करावी, अशी सूचना खा.चव्हाण यांनी केली.

बैठकीत अनुषंगीक योजना तसेच त्यातील कामाबाबत अहवाल संबंधीत यंत्रणांनी सादर केला. त्यावर उपस्थित समिती सदस्यांनी विविध मुद्यांवर चर्चा करुन उपयुक्त सूचना केल्या. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले व आभार मानले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मला माफ करा… मी हरलो…!

News Desk

आदित्य ठाकरेंचा ‘नाईट लाईफ’चा निर्णय लांबणीवर पडणार?

News Desk

सरकारकडून मराठा समाजाच्या तोडांला पाने पुसली. – अजित पवार   

News Desk