HW News Marathi
Uncategorized

लीबियाच्या हुकूमशहासोबत भारतीय मॉडलेचा गोतावळा

वृत्तसंस्थाः लीबियाचा हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी अभिनेत्री कतरीनाचा फोटो सध्या सोशल मीडियावर झळकत असून कतरिना गद्दाफीसोबत काय करत होती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

फॅन क्लबने सोमवारी ट्विटरवर एक फोटो शेअर केला असून त्यात गद्दाफी हा खुर्चीवर बसलेला आहे तर कतरीना ही गद्दाफीच्या पायाजवळ बसलेली दिसत आहे. अवघ्या १८ वर्षाची असलेली कतरीना ही एकटीच फोटोत नसून तिच्यासोबत अभिनेत्री नेहा धुपिया, मॉडेल आदिती गोवित्रीकर, आंचल कुमार आणि शमिता सिंघा या सुद्धा आहेत. हा फोटो जुना असून तो १५ वर्षापूर्वीचा आहे.

१५ वर्षापूर्वी हॉलीवूडचे प्रसिद्ध पॉप स्टार बियान्से, मारिया करेसह अनेक पॉप स्टारने पैसे देवून गद्दाफीच्या मुलाने ठेवलेल्या पार्टीत परफॉर्मन्स केला होता. यावरून त्यावेळी मोठा वाद झाला होता. चित्रपटात येण्याआधी कतरीना मॉडेलिंग करायची. तसेच ती लंडन फॅशन वीक आणि इंडिया फॅशन वीकमध्येही दिसली होती. विजय मल्ल्याच्या किंगफिशर कॅलेंडरमध्ये तिनं आपला जलवा दाखवला होता. कतरीनाने वयाच्या १४ व्या वर्षापासून मॉडेलिंगला सुरूवात केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची पीएम केअर्स फंडाला २६ कोटींची मदत

News Desk

ग्रामीण विकासात पदविका अभ्यासक्रम

News Desk

ते हॉट स्पॉटमध्ये नाहीत, न हॉट स्पॉटला जाणार आहेत, मग काय प्रॉब्लेम?

News Desk