HW News Marathi
Uncategorized

लॉर्डसवर सौरवसारखा शर्ट फिरवण्याची संधी गमावली, ऋषी कपुरच्या कंमेटने वाद

मुंबईः सातत्याने टि्वट करून चर्चेत राहणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर एका नव्या टि्वटने ट्रोलरच्या टीकेचे धनी झाले आहेत. ऋषी कपूर यांनी भारतीय महिला टीमवर अश्लिल टि्वट केले आहे. ऋषी कपूरने रविवारी संध्याकाळी त्यांच्या ऑफिशियल अकाऊंटवर हे टि्वट केले आहे. लॉर्डस ग्राऊंडवर सौरव गांगुलीने केलेली कृती पुन्हा केली जाईल, याची वाट पाहत आहे. २००२ मध्ये भारताने नेटवेस्ट मालिकेतील अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत केलं होतं. तेंव्हा सौरवने केलेली कृती आठवतेय,’ असे ऋषी कपूर यांनी या टि्वटमध्ये म्हटले आहे.

लॉर्डस मैदानवर भारताने अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचा तत्कालिन कर्णधार सौरव गांगुलीने अंगातील शर्ट काढून भिरकावत जल्लोष केला होता. त्यामुळे गांगुलीवर त्यावेळी टीकाही झाली होती. महिला टीमनेही इंग्लंडला हरवून सौरव सारखं कृत्य करावं, असं सुचवणारं अश्लिल टि्वट ऋषी कपूर यांनी केल्याने ट्रोलरने त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. एका ट्रोलरने तर त्यांना’सर आज जॅक डॅनियल की ब्लॅक लेबल घेतली?,’ अशी खोचक टीका केली. तर दुसऱ्याने ‘रविवार असल्यामुळे पूर्ण बॉटल पिऊन टि्वट करावं असं काही नाही,’ असा टोला लगावला. भारतीय महिला संघात सनी लियोनी नसल्याचं सांगत एका ट्रोलरने कपूर यांची फिरकी घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केलं!

swarit

मी भाजपात समाधानी आहे !

swarit

राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५००च्या जवळ, चिंता वाढली

News Desk