HW News Marathi
Uncategorized

मी पवार आणि राष्ट्रवादीसोबतचं…मोहिते-पाटलांचे घुमजाव !

पुणे |  पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा कार्यक्रम पार पडला. साखर संघाच्या या पुण्यातील बैठकीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात चांगलीचं साखरपेरणी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण या कार्यक्रमानंतर माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडली नसून आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबतचं आहोत, कुठेही गेलेलो नाही असो विधान केले आहे. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तुम्ही राष्ट्रवादीतच आहात का असा प्रश्न यावेळी मोहिते पाटलांना विचारण्यात आला. त्यावर विजयसिंह म्हणाले, “मी कुठेही गेलेलो नाही. मी अजून राष्ट्रवादीतच आहे. मी याआधी 3 वेळा शरद पवारांना भेटलो आहे”

विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला रामराम करत  भाजपामध्ये पक्षप्रवेश केला होता.  मात्र विजयसिंहांनी अद्याप पक्ष सोडलेला नाही.परंतु लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही वेळी त्यांनी उघडपणे भाजपचा प्रचार केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मते मुलाला पक्षात घेतलं की वडील येतातचं,त्याप्रमाणे वैभव पिचड-मधुकर पिचड ,सुजय विखे- राधकृष्ण विखे ही पिता-पुत्रांची जोडी भाचपात आली. विजयसिंहांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला नसला तरी ते वारंवार भाजपच्या मंचावर दिसुन आले,अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकलूजच्या सभेत मोदींनी त्यांचे अभिष्ठचिंतन केले. त्यामुळे ते भाजपात आहेत अशा पद्धतीची वातावरणनिर्मिती करण्यात आली.

आज विजयदादा आणि शरद पवार बऱ्याच दिवसांनी एका मंचावर आले,त्यांच्यामध्ये चर्चा सुद्धा झाली. सध्या महाराष्ट्रात महाविकासआघाडीची सत्ता आहे. सत्तेत राहुन मतदारसंघातील कामे करतात अशा प्रकारची वक्तव्ये प्रत्येक पक्षांतर करणारा नेता महाराष्ट्रात करत होता. रणजितसिंह मोहिते -पाटील आता भाजपमध्ये आहेत,विजयदादांनी पक्षांतर केलेलं नाही,त्यामुळे आता मतदारसंघाची विकासाची कामे करण्यासाठी तर विजयसिंहांना आपण सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीमध्ये आहेत याची उपरती झाली नसेल ?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विमानाचे तिकीट मिळणार रेल्वे अॅपवरून

News Desk

धक्कादायक, स्वताच्या मुलीसह 140 महिलांवर 1000 वेळा बलात्कार , केलेल्या क्रूरकर्माचा हिशोब डायरीत नोंद

News Desk

केंद्रीय सुरक्षा बलाच्या ६ जवानांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

News Desk