HW News Marathi
Uncategorized

५०० रुपये भरून आजपासून जिओ स्मार्टफोनची नोंदणी

मुंबई रिलायन्सनं ज्या फोनचे वर्णन ‘इंडिया का इंटेलिजन्ट फोनअसं केले आहे, त्या पूर्णपणे मेड इन इंडिया’ असलेल्या आणि ग्राहकांना केवळ ५०० रुपयांत उपलब्ध होणाऱ्या जिओ स्मार्टफोनसाठी नोंदणी आज संध्याकाळपासून पाच वाजता सुरू होणार आहे.

५० कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी आठवड्याला ५० लाख फोनची निर्मिती करण्याचं लक्ष रिलायन्सने ठेवलं आहे. या फोनचं प्री-बुकिंग करण्यासाठी ग्राहकाला 500 रुपये भरावे लागणार आहेत. रिलायन्सच्या वेबासाइटवर, माय जिओ अॅपवर आणि रिलायन्स डिजिटल स्टोअरमध्ये फोनचं प्री-बुकिंग केलं जाईल. कंपनीने या फोनची किंमत सिक्युरिटी डिपॉझिटच्या माध्यमातून १५०० रुपये ठेवली आहे, तीन वर्षांनंतर या पैशांचा पूर्ण रिफंड ग्राहकांना मिळणार आहे. प्री बुकिंग करताना ग्राहकांना ५०० रुपये भरावे लागणार आहेत. तर उर्वरीत १००० रुपये फोन मिळाल्यानंतर भरायचे आहेत.

 

फोनमधील सुविधा

जिओ स्मार्टफोनमध्ये १२ भाषा देण्यात आल्या आहेत. या फोनमध्ये वायफाय, ब्लूट्यूथ, जीपीएस आणि यूएसबीच्या सुविधा आहेत. या फोनवर 153 रुपयांत प्रत्येक महिन्याला फ्री व्हॉइस कॉलसह अनलिमिटेड इंटरनेट मिळणार आहे. जिओ फोन कोणत्याही टीव्हीला जोडता येऊ शकणार आहे.

रिलायन्स जिओच्या या फोनमध्ये 2.4 इंच डिस्प्ले आणि512 एमबी रॅम असणार आहे. तसेच 4 जीबी इंटर्नल स्टोरेज सुविधा असेल. 2 मेगा पिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि VGA फ्रन्ट कॅमेरा असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केळीच्या घटातून पाठवल्या जातात बनावट नोटा

News Desk

“एका बापाने काय बोलायचं?”, म्हणत लेकीच्या लग्नानंतर भावूक झाले Jitendra Awhad

News Desk

आम्ही छत्रपती संभाजी आणि शिवाजी महाराजांचे वंशज,औरंगजेबाचे नाही ! औरंगाबादचं संभाजीनगर करणार ..

Arati More