HW Marathi
Uncategorized देश / विदेश

#NirbhayaCase : दोषी विनय शर्माच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या होणार सुनावणी

नवी दिल्ली | निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी विनय शर्मा यांची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली. राष्ट्रपतींनी फेटाळलेल्या दया याचिकेच्या निर्णयाविरोधात आरोपी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आरोपीच्या याचिकेवर उद्या (१५ फेब्रुवारी) सुनावणी होणार आहे. दोषी वियन शर्माने आपली मानसिक स्थिती बिघडल्याचे सांगत फाशीच्या शिक्षेपासून मुक्त करण्याची मागणी याचिके केली.

आई-वडिलांनी एक याचिका दाखल केली होती. यामध्ये चारही दोषींसाठी नवीन डेथ वॉरंट जारी करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी (१२ फेब्रुवारी) न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. निर्भयाची आई आशादेवी म्हणाल्या की, “माझ्या अधिकाराचे काय झाले ?  मी हात जोडून उभी आहे. या खटल्याला सात वर्षांहून अधिक काळ लोटला गेला, तरीही मी निर्भयाला न्यायची प्रतिक्षा करत आहे, असे म्हणत निर्भयाच्या आईला रडू कोसळले.” निर्भया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर दया याचिका आणि क्युरेटिव्ह पिटीशनमुळे दोन वेळा फाशी टाळावी लागली. न्यायालयाने सध्या अनिश्चितकाळासाठी दोषींची फाशीची तारीख टाळली आहे.

१६ डिसेंबरची  ‘ती ‘ काळरात्र  

१६ डिसेंबर २०१२च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरू झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. मात्र, आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. त्यावेळी त्यांनी तिला अत्यंत निर्घृणपणे मारहाणही केली होती. त्यामुळे निर्भया गंभीररित्या जखमी झाली होती. यानंतर आरोपींनी निर्भयाला रस्त्याकडेला फेकून दिले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. जखमी निर्भयावर आधी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला सिंगापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सिंगापूरमध्ये उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

 

Related posts

त्रिपुराच्या राज्यपालांची अति घाई, मृत्यूपूर्वीच वाजपेयींना वाहिली श्रद्धांजली

News Desk

गुजरातमध्ये रेड अलर्ट जारी, १२ तासात ‘वायू’ चक्रीवादळ धडकणार

News Desk

‘कोरोना विषाणू’चे २ संशयित मुंबईत आढळले

अपर्णा गोतपागर