मुरगुड ( कागल / कोल्हापूर ) | तुरीपासून डाळ बनवण्याच्या प्रक्रियेत झालेला 2500 हजार कोटी रुपयांचा घोटाळा पुराव्यासह विधानपरिषदेत मांडणा-या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या घोटाळ्यावरुन पुन्हा एकदा पणन मंत्री सुभाष देशमुख यांना लक्ष्य केले असून सभागृहात मुख्यमंत्र्यांनी या घोटाळ्याला क्लीनचिट दिली असली तरी आपण जनतेवर समोर पुन्हा हा घोटाळा मांडू असा पलटवार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात आज कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगुड येथुन झाली . पश्चिम महाराष्ट्रातील या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सांगली येथील एका कार्यक्रमात पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी हल्लाबोल यात्रेवर टीका केली होती त्याचा संदर्भ घेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की श्री सुभाष देशमुख यांनी हल्लाबोल यात्रेचा धसका घेतला असल्यामुळेच असल्यामुळेच ते आमच्यावर टीका करीत आहेत मागील आठवड्यात मी सभागृहात त्यांनी केलेला अडीच हजार कोटींचा तूरडाळीचा घोटाळा पुराव्यासह सभागृहात सभागृहात मांडला तो तुमचा डल्ला नव्हता का असा प्रश्न उपस्थित करीत स्वतःच्या कारखान्यातील सभासद शेतकऱ्यांच्या नावे कुठे कर्जे काढून त्यांनी मोठे स्कॅम केले असल्याचा आरोपही त्यांनी केला. सुभाष देशमुख यांनी आरक्षित जागेवर स्वतःचा बंगला बांधल्याच्या मुद्द्यावरून माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांना लक्ष केले
काल आम्ही आंबाबाईचा रथ ओढला आणि आंबाबाईला साकडं घातलं की राज्यात जे सरकार बसलं आहे ते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे.या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. तेव्हा या सरकारला हद्दपार करण्यासाठी आम्हाला बळ मिळो असं साकडं आम्ही घातल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
काल देशभरात एप्रिल फुलच्या निमित्ताने लोकांनी मोदीजींचा वाढदिवस साजरा केला. मोदींचं सरकार आल्यापासून देशातील जनतेचा रोज एप्रिल फुल होत असल्याची टीका त्यांनी केली.
काल देशभरात एप्रिल फूलच्यानिमित्ताने लोकांनी मोदीजींचा वाढदिवस साजरा केला. मोदींचं सरकार आल्यापासून देशातील जनतेचा रोजच एप्रिल फूल होत आहे. – @dhananjay_munde #HallaBol #मुरगुड #कोल्हापूर pic.twitter.com/sKnETGuG9K
— NCP (@NCPspeaks) April 2, 2018
ललित मोदी पैसे घेऊन पळाले, मल्ल्या पैसे घेऊन पळाला, निरव मोदी पैसे घेऊन पळला. असेच जर हे लोक पळू लागले तर १५ लाख खात्यात यायचे सोडा आपल्यावरच कर्ज होण्याची भीती आता निर्माण झाली आहे. बेरोजगारी, महागाई, वाढते गुन्हे यासाठी हे आंदोलन असल्याचे सांगून आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की वर नरेंद्र, खाली देवेंद्र आणि मंत्रालयात उंदिर आहेत असा टोला लगावला.
कर्जमाफीबाबतीत या सरकारने सर्वात मोठी फसवणूक केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणाले पण प्रत्यक्षात दिली नाही.
विनोद तावडे यांनी महापुरुषांच्या फोटोत भ्रष्टाचार केला. पंकजा मुंडे यांनी लहान मुलांच्या चिक्कीत घोटाळा केला. घोटाळे करून करून नवसाने मुल झालं आणि मुके घेऊन मारलं अशी परिस्थिती या सरकारची होऊ नये असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ आमदार शशिकांत शिंदे आमदार जयदेव गायकवाड आमदार रामराव वडकुते माजी खासदार रणजित सिंह मोहिते-पाटील महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.