HW News Marathi
Uncategorized

राज्यात ‘कोरोना’ उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये घोषित

मुंबई | ‘कोरोना’ला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून २३०५ खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२ एप्रिल) दिली आहे. या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे.

राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात चाचण्यांची सुविधा वाढवितानाच आवश्यकता भासल्यास रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषीत करण्यात आली असून त्यासाठी आरोग्य संचालकांनी अधिसूचना काढली आहे, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी यावेळी सांगितले आहे.

जिल्हा आणि त्यातील अधिसूचीत रुग्णालयाची नाव कंसात खाटांची संख्या:

  • ठाणे- जिल्हा रुग्णालय, टी.बी बिल्डींग (१००)
  • मीरा भाईंदर- पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय (१००)
  • वाशी- सामान्य रुग्णालय (१२०)
  • कल्याण डोबिवली म.न.पा.- शास्त्री नगर दवाखाना (१००)
  • रायगड- पनवेल उपजिल्हा रुग्णालय (१००)
  • नाशिक- कुंभमेळा बिल्डींग व महानगरपालिका कठडा हॉस्पीटल अनुक्रमे (१००) (७०)
  • अहमदनगर- जिल्हा रुग्णालय (१००)
  • नंदूरबार- डोळ्यांचा दवाखाना (५०)
  • धुळे- जिल्हा रुग्णालया शहारातील इमारत (५०)
  • पुणे- जिल्हा रुग्णालय, औंध (५०)
  • सातारा- सामान्य रुग्णालय (६०)
  • सिंधुदूर्ग- नविन इमारत एएमपी फंडेड (७५)
  • रत्नागिरी- सामान्य रुग्णालय व कळंबोळी उपजिल्हा रुग्णालय अनुक्रमे (१००) (५०)
  • औरंगाबाद- जिल्हा रुग्णालय (१००)
  • हिंगोली- जिल्हा रुग्णालय (१००)
  • हिंगोली- कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय (५०)
  • लातूर- उदगीर उपजिल्हा रुग्णालय (५०)
  • उस्मानाबाद- जिल्हा रुग्णालय, नविन इमारत (१००)
  • उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डींग (५०)
  • तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नविन इमारत (५०)
  • नांदेड- जिल्हा रुग्णालय जुने (५०)
  • मुखेड उपजिल्हा रुग्णालय (५०)
  • अमरावती- विशेषोपचार रुग्णालय नविन इमारत (१००)
  • वाशीम- जिल्हा रुग्णालय, डीईआयसी इमारत (५०)
  • बुलढाणा-स्त्री रुग्णालय नविन इमारत (१००)
  • वर्धा- सामान्य रुग्णालय (५०)
  • भंडारा- सामान्य रुग्णालय एएमसीएच विंग नविन इमारत (८०)
  • गडचिरोली- जिल्हा रुग्णालय (१००)

यासर्व जिल्हा रुग्णालयातील सर्व खाटा मिळून २३०५ खाटा कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध होणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शहीदांच्या कुटुंबाला आर्थिक मदत तर एका व्यक्तीला सरकारी नोकरी

News Desk

जेट एअरवेजच्या उपाध्यक्षांना अटक

News Desk

‘या’ मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीदरम्यान झाल्याची चर्चा

News Desk