HW News Marathi
Uncategorized

धक्कादायक! न्युयॉर्कमधील प्राणीसंग्राहलयात ४ वर्षाच्या वाघिणीला कोरोनाची लागण

न्युयॉर्क | जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसने आत्तापर्यंत लाखाच्या घरात लोकांचे प्राण घेतले आहेत. वटवागळामुळे कोरोनाची लागण होते हे समोर आले होतेच पण आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. न्युयॉर्क येथील द ब्रॉन्क्स या प्राणीसंग्रहालयातील ४ वर्षाच्या वाघाला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याची ही प्रथमच घटना आहे. २७ मार्चला नदिया नावाच्या वाघाबरोबरच अन्य ६ वाघांमध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली होती. प्राणिसंग्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्राणिसंग्रालयातील एखाद्या कर्मचाऱ्यामुळेच या वाघांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे. कारण १६ मार्च पासून हे प्राणी संग्रालय नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते.

अमेरिकेच्या वन्यजीवन संरक्षण विभागाच्या माहितीनुसार, या सगळ्या वाघांमध्ये अन्नाचे सेवन कमी झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर त्यांना खोकलाही सुरू झाला. जेव्हा परीक्षण केले, तेव्हा नादिया हिला कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे इतर प्राण्यांचीही चाचणी करण्यात आली असून अद्याप त्यांचे अहवाल आले नाही आहेत. ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयात हिमबिबट्या, चित्ता, क्लाउडेड लेपर्ड, अमूर लेपर्ड, पुमा असे अनेक प्राणी आहेत. पण त्यांच्यात अजून कोरोनाची लक्षण आढळून आली नाही आहेत. वन्यजीवन संरक्षण विभागाने प्राणिसंग्रहालयाच्या आतच चाचणी केंद्राची स्थापना केली असून नादियाला संक्रमण नेमके कसे झाले याचा शोध सुरु आहे.

दरम्यान, वाघाला झालेल्या कोरोनामुळे जगातील इतर प्राणीसंग्राहलयात आता सतर्कता बाळग्याचा इशारा सरकारने दिला आहे. भारत सरकारच्या पर्यावरण आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाला पत्र लिहिले आहे. त्यामध्ये, अमेरिकेत एका वाघिणीला कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्वच प्राणीसंग्रहालयांच्या प्रमुखांना पत्र लिहून योग्य ती काळजी घेण्याचे सूचविण्यात आले आहे. प्राणीसंग्रहालयातील प्राणी आणि त्यांचे देखभाल करणाऱ्यांची विशेष काळजी घेण्याचं बजावण्यात आलं आहे. सर्वच प्राण्यांची सीसीटीव्हीच्या निगराणीत काळजी घ्यावी, तसेच देखभाल करणाऱ्या स्टाफलाही महत्वाची साधनसामुग्री उपलब्ध करुन द्यावी, असे या पत्रात म्हटले आहे.

तसेच, इतर प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी. संशयास्पद प्राण्यांचे नमुने प्राणी आरोग्य संस्थेकडे दर पंधरा दिवसांनी पाठवावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्राणिसंग्रहालयांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी वैयक्तिक स्वच्छतेची संपूर्ण काळजी घ्यावी. प्राणिसंग्रहालयांनी सातत्याने शासनाच्या त्या त्या ठिकाणच्या नोडल संस्थेच्या नियमित संपर्कात राहावे, असेही प्राधिकरणाने दिलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंगणवाडीच्या आहारात अळी बालकांचे आरोग्य धोक्यात

News Desk

TATA Airbus प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर Uday Samant यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत

Seema Adhe

तिरंगा परिवारातर्फे १५ ऑगस्टला देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमासह पुरस्कार वितरण

News Desk