HW News Marathi
राजकारण

हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा! – उद्धव ठाकरे

मुंबई | “हेक्टरी 50 हजार रुपये ही शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा आहे”, असे समर्थन  माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून पायउतार झाल्यानंतरचा हा त्यांच्या पहिला दौरा आहे. उद्धव ठाकरे यांचे औरंगबादमध्ये येथील विमानतळावर शिवसैनिकांकडून स्वागत केले आहे.  औरंगाबादेतील दहेगावातील जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसाणीची पाहाणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून राज्याचेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “50 हजार रुपये रोख रक्कम ही मागणी मी शेतकऱ्यांच्या वतीने करतोय, म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय. सरकार नुकस्तानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे कधी करणार आणि यानंतर मदतीचे घोडे कधी धावणार. तोपर्यंत या शेतकऱ्यांचे आयुष्य बरबाद होतय. हा सीजन गेला आणि हा हंगाम संपला. आता पुढच्या वेळेला हंगाम होईल, दिवाळी साजरी करा किंवा करू नका, शेतकऱ्यांचा अधिकार नाही ये का?, दिवाळी साजरी करण्याचा अधिकार नाहीये का?, यामुळे पंचनामे करायचे ते करा आणि ओला दुष्काळ आतापर्यंत जाहीर करायला पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर करा किंवा नका करू, शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे उद्धव ठाकरेंनी जाहीर केले आहे.”

आत्महतेचा विचार मनात आणू नका

शेतकऱ्यांनी आत्महतेचा विचार करू नका, असे म्हणत आवाहन शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंनी केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “ही माझी भेट प्रतिकात्मक आहे. सरकारला तुमच्याकडे लक्ष देण्याचा वेळ जरी नसला. तरी शिवसेना सतत आणि सतत तुमच्यासोबत आहे. आमच्यासोबत महाविकासआघाडीचे इतर मित्र पक्ष आहेत. काळजी करू नका आणि धीर सोडू नका. काही ही करून आत्महतेचा विचार मनात आणू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आता शेतकरी म्हणून तुम्ही एकत्र या.  भेट देण्याची वेळ असो वा नसो.”

शिंदे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, उद्धव ठाकरेंची मागणी

उद्धव ठाकरे म्हणाले, “हे सरकार स्पष्टपणे सांगते की, ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी परिस्थिती नाही. म्हणून मी मुद्दाम पाहाणी करायला आलोय. आणि ही माझी प्रतिकात्मक भेट आहे. खर काय खोटे काय हे आपल्या माध्यमातून केवळ सरकारलाच नव्हे. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला कळू देत. हे शेतकरी संकटनात असताना, काही काही जणांनी मला आता सांगितले की, त्यांना रेशन घेण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नाही. सरकार जो शिधा वाटप करते, तो शिधा येतोय कुठून शेतकऱ्यांकडूनच ना?, शिधा वाटप ते ही होत नाहीये?, असे सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले आहे. या मुद्द्यावर उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, “शिधा वाटपात घोटाळा झाला की नाही हा नंतर संशोधनाचे काम होऊ शकेल.”

संबंधित बातम्या

उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन साधला संवाद

 

 

Related posts

“राष्ट्रवादीचा एक मोठा नेता लवकरच देशमुख आणि मलिकांना भेटणार”, कंबोज यांचे खळबजनक ट्वीट

Aprna

पंतप्रधान मोदी आज वाराणसी दौ-यावर

News Desk

कसब्यात ‘मविआ’चे रवींद्र धंगेकर यांचा विजय; 28 वर्षानंतर ‘भाजप’चा पराभव

Aprna