हैदराबाद | हैदराबादमधील वशुवैद्यकी तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार आरोपींना तेलंगणा पोलिसांकडून आज (६ डिसेंबर) पहाटे ५.४५ वाजता एन्काऊंटर करण्यात आले. तेलंगणा पोलिसांकडून पीडित तरुणींला जीवत जाळलेल्या ठिकाणी या चारही आरोपींना घटनास्थळावर गुन्ह्यांचा घटनाक्रम जाणून घेण्यासाठी नेले होते. मात्र, आरोपींनी या घटनास्थळावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे अखेर पोलिसांनी आरोपींवर गोळीबार करत त्यांचे आरोपींचा एन्काऊंटर केल्याची माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या ३० मिनिटांक काय घडले त्यांचा सविस्तर वृत्तांत दिला.
Cyberabad CP, VC Sajjanar: The police warned them and asked them to surrender but they continued to fire. Then we opened fire and they were killed in the encounter. During encounter, two police men have been injured and they have been shifted to the local hospital. https://t.co/CaVAXikdjo
— ANI (@ANI) December 6, 2019
पोलीस आयुक्त सज्जनार पुढे म्हणाले की, “मानवाधिकार आयोग किंवा अन्य कोणत्याही संघटनांच्या चौकशी आणि प्रश्नांना सामोरे जाण्यास आम्ही तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.” या प्रकरणात आरोपींना तेलंगाणामधील शादनगर दंडाधिकाऱ्यांनी १० दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत सुनावली होती. या प्रकरणातील संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्यासाठी या चारही आरोपींना पोलिसांनी घटनास्थळी घेऊन गेले होते. दरम्यान, आरोपी चेन्नाकेशवुलु आणि आरिफ यांनी पोलिसांजवळील बंदूक हिसकावून त्यांच्यावर काठी आणि दगडाने पोलिसांवर हल्ला करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. आणि इतर नवीन आणि शिवा यांनी दोन आरोपींनी पोलिसांवर गोळीबारदेखील केला. या गोळीबारात २ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या पोलिसांची प्रकृती स्थिर आहे. घटना सकाळी ५.४५ ते ६.१५ वाजण्याच्या दरम्यान घडली.
Cyberabad CP, VC Sajjanar on NHRC taking cognizance of today's encounter: We will answer to whoever takes cognizance, the state govt, NHRC, to all concerned. https://t.co/jlRvnvRwd1
— ANI (@ANI) December 6, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.