HW News Marathi
Uncategorized

अपहरणाच्या धमकीनंतर विमान जमीनीवर

वृत्तसंस्थाः विमानाचे अपहरण व बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर जेट एअरवेजचे मुंबईहून दिल्लीला जाणारे विमान अहमदाबादच्या विमानतळावर उतरवण्यात आले. सुरक्षेसाठी विमानाच्या मार्गात बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

जेट एअरवेजच्या ९ डब्ल्यू ३३९ या विमानाने रात्री उशिरा २.५५ वाजता मुंबईहून दिल्लीच्या दिशेने उड्डाण केले होते. विमानात हायजॅकर्स असल्याचा सतर्कतेचा इशारा वैमानिकाला मिळाला होता. तसेच विमानातील स्वच्छतागृहात संशयास्पद चिठ्ठीही सापडली. त्यामुळे ३ वाजून ४५ मिनिटांनी हे विमान अहमदाबाद विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीत उतरवण्यात आले. विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरण्यासंबंधी सूचना दिल्या. तसेच त्यांची तपासणीही केली. सुरक्षेसंबंधी कारणांमुळे विमानाचा मार्ग बदलण्यात आल्याचे समजले, अशी माहिती काही विमान प्रवाशांनी दिली. तर धमकीचा फोन आल्याने विमानाचा मार्ग बदलण्यात आला, अशी माहिती अहमदाबाद विमानतळावर तैनात असलेल्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याने दिली. परंतु ही धकमी कोणी व का दिली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांवर वेब सीरिज केल्यास ३०० कोटी रॉयल्टी मिळेल, सोमय्यांची खोचक टीका

News Desk

आणखी एका अभिनेत्रीची आत्महत्या

News Desk

मुंबई व परिसरात तुफान पाऊस, जनजीवन विस्कळीत

News Desk