HW News Marathi
Uncategorized

आशिया खंडातील अर्थसत्ता उध्वस्त करण्याचा अमेरिकेचा डाव ?

Special article

जगाची वाटचाल तिसऱ्या महायुद्धाकडे ?

पी. रामदास : अमेरिकेनंतर जगाची अर्थसत्ता आशिया खंडातील चीन, जपान व भारत या देशांत एकवटलेली आहे. अमेरिकेला थेट आवाहन देण्याची क्षमता याच तीन देशांत आहे. परंतु या देशांमध्ये सध्या युद्धजन्य स्थिती निर्माण झालेली असून त्याचा कधीही भडका उडू शकतो.

उत्तर कोरियाची अमेरिकेला बॅलेस्टिक मिसाइलद्वारे उडवण्याची धकमी, चीनची भारतावर हल्ला करण्याचा इशारा, जपान, चीन कोरियाच्या विरोधात अमेरिकेच्या बाजुने युद्धासाठी सज्ज. अमेरिकेची व्हेनेझुएलावर हल्ला करण्याची तयारी. या सर्व घडामोडी पाहिल्यानंतर जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचे संकेत मिळत आहेत. कधीही युद्धाचा भडका उडून सर्वच नष्ट होतील, अशी परिस्थिती जागतिक पटलावर सध्या तरी दिसत आहे. निरंतर चर्चेतून यावर तोडगा काढणे शक्य आहे.

डोकलामच्या मुद्द्यावरून भारत, चीन, भुतानध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. तीन आठवड्यापासून भारताने डोकलामध्ये आपले सैन्य उभे करून चीनसमोर तगडे आव्हाने उभे केले आहे. दुसरीकडे चीनदेखील आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज आहे. सैन्यांच्या अनेक तुकड्यांनी त्यांनी डोकलाम परिसरात तैनात केल्या आहेत. सैन्य मागे घ्या, डोकलाम आमचाच असल्याचा दावा ते करतात. 1962च्या युद्धात ज्या प्रमाणे भारताचा पराभव केला होता, तसाच पराभव करण्याची धमकी चीन देत आहे. परंतु सध्या परिस्थिती बदलेली आहे. त्यामुळे चीनला भीक घालण्यास भारतीय सैन्य तयार नाही. चीन तीन आठवड्यापासून आर-पारची भाषा करत आहे. दुसरीकडे हाच चीन उत्तर कोरियाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. युद्धातून कोणाचेही भले होणार नाही, त्यामुळे अमेरिकेवर बॅलेस्टिक मिसाइल टाकण्याचा विचार कोरियांने सोडावा, असा चीनचा सल्ला आहे. एकीकडे स्वतः दुसऱ्या देशाला धमक्या देण्याचा सिलसिला सुरू ठेवायचा आणि दुसरीकडे सम्यंजस भूमिका घ्यायची हे चीनचे धोरण दुटप्पी वाटते. अमेरिकेला थेट आव्हान देण्याची चीनची धमक आहे, परंतु युद्धातून काही निष्पन्न होणार नसल्याने चीन अमेरिकाधार्जिणा झाला आहे, हे या निमित्ताने उल्लेखनीय बाब आहे.

दुसरीकडे जपानदेखील कोरियाच्या विरोधात उभा राहिला आहे. कोरियाने क्षेपाणास्रे डागली तर ती नष्ट करणारी यंत्रणा त्यांनी सज्ज ठेवली आहे. कोरियाची चहुबाजुने कोंडी करण्यासाठी जपान, चीन अमेरिका सज्ज आहे. याचा परिणाम वेगळा होऊ शकतो. जर कोरियांना अमेरिकेच्या गुआम प्रांतावर हल्ला केला तर हे तिन्ही देश कोरियाला उध्वस्त करतील. असे झाल्यास कोरिया आपल्याकडी हायट्रोजन बॉम्बने जग उध्वस्त करून टाकेल. या सर्व बाबी जर तरच्या असल्या तरी त्या अशक्य नाहीत.

भारत-चीन युद्ध भडकल्यास दोन्ही देशांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कोरिया देखील चीन, जपानला देखील याची झळ पोहोचू शकते. तिकडे पाकिस्तान जम्मू काश्मीरमध्ये वारंवार शस्रसंधीचे उल्लंघन करत आहे. गेल्या वर्षभरापासून दोन्ही देशात शीतयुद्ध सुरू आहे. त्याचाही काही दिवसांत भडका उडण्याची शक्यता आहे. कारण चीन जम्मू काश्मीरमध्ये भारताविरोधात जावून पाकिस्तानला मदत करण्याच्या तयारीत आहे. एकूणच या सर्व युद्धजन्य परिस्थितीत आशिया खंडातील प्रमुख अर्थकेंद्र असलेल्या देशांना मोठी झळ पोहण्याची शक्यता आहे. कदाचित हाच अमेरिकेचा डाव असू शकतो.

दरम्यान, कोरियाच्या धमकीनंतर अमेरिका प्रत्युत्तरास सज्ज असल्याचे सांगत आहे. दुसरीकडे वेनेझुअला उध्वस्त करण्याची धमकी देत आहे. एक संकट असताना दुसऱ्यांना कसे संकटात टाकायचे, याचे आखाडे अमेरिका सातत्याने आखते, हे या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे. एकूणच जग हे तिसऱ्या युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचे या घडामोडीवरून स्पष्ट होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray | सत्तेत सगळं समसमान असलं पाहिजे !

News Desk

आम्ही छत्रपती संभाजी आणि शिवाजी महाराजांचे वंशज,औरंगजेबाचे नाही ! औरंगाबादचं संभाजीनगर करणार ..

Arati More

कोरेगाव-भीमा तपास एनआयएकडे सोपविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर शरद पवार नाराज

News Desk