HW News Marathi
Uncategorized

२ हजार कोटींची कमाई करणारा आमिरचा ‘दंगल’ पहिला भारतीय चित्रपट

मुंबई – मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘दंगल’ सिनेमानं इतिहास रचलाय. भारतासह जगभरात सुमारे दोन हजार कोटींची कमाई करणारा हा पहिलाच भारतीय सिनेमा ठरलाय. चीनमध्ये सोमवारी अडीच कोटी रूपयांचा गल्ला जमवत दंगलनं हा विक्रम केलाय.

‘दंगल’ या सिनेमानं फक्त कमाईचेच नव्हे, तर विक्रमांचेही आकडे मोडले आहेत. ‘दंगल’ इंग्लिश व्यतिरिक्त इतर भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट इतिहासातील पाचवा सिनेमा ठरला आहे. ‘दंगल’ हा 2017 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा पहिलाच क्रीडा सिनेमा आहे. तर चीनमध्ये सर्वाधिक गल्ला जमवणारा पहिलाच नॉन-हॉलिवूड सिनेमा ठरला आहे.

पैलवान महावीर फोगाट यांच्या जीवनावर आधारित या सिनेमात आमिर खानने प्रमुख भूमिका साकारली आहे. सिनेमाचं कथानक आणि महावीर फोगाट यांच्या संघर्षाचं जागतिक स्तरावर कौतुक केलं जात आहे. भारतातही या सिनेमाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे. ‘दंगल’ने प्रदर्शनापासून बॉक्स ऑफिसवर तीनच दिवसात 100 कोटीचा गल्ला गोळा केला होता. कमी दिवसात हा टप्पा पार करणारा आमिरचा हा पाचवा सिनेमा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीम टायगर सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

News Desk

आणखी एका अभिनेत्रीची आत्महत्या

News Desk

राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यात काय गैर: गौतम गंभीर

News Desk