टोक्यो | टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारत कमालीची कामगिरी बजावत आहे. नीरज चोप्रा नंतर भारताला अजून एक गोल्डन मॅन मिळाला आहे. सुमित अंतिलने भालाफेकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला आहे. एवढेच नव्हे, तर या कामगिरीसोबत सुमितने विश्वविक्रमही मोडला आहे. त्याने एफ-६४ प्रकारात ६८.५५ मीटर लांब भाल फेकत विश्वविक्रम आपल्या नावावर केला. याआधी नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्येच सुवर्णपदक पटकावले होते.
भारतासाठी हे सलग दुसरे सुवर्ण
भारतासाठी हे एकाच दिवशी सलग दुसरे सुवर्ण पदक आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताची शानदार कामगिरी सुरूच आहे. सुमितच्या आधी भारताला नेमबाजीतही सुवर्णपदक मिळाले आहे. भारतासाठी हे सलग दुसरे सुवर्ण आहे. अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले आहे.
#TokyoParalympics, Men's Javelin Throw: Sumit Antil wins gold (Sport Class F64) with World Record throw of 68.55m pic.twitter.com/fQqBgevgHZ
— ANI (@ANI) August 30, 2021
पंतप्रधानांकडून कौतुक
सुमितच्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केले आहे. ”आमचे खेळाडू पॅरालिम्पिकमध्ये चमकत आहेत! पॅरालिम्पिकमधील सुमित अंतिलच्या विक्रमी कामगिरीचा राष्ट्राला अभिमान आहे. सुमितने प्रतिष्ठित सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. तुला भविष्यासाठी शुभेच्छा”, असे ट्वीट मोदींनी केले आहे. रस्त्यावर झालेल्या अपघातात एक पाय गमावलेल्या सुमितचे हे पदक इतरांसाठी प्रेरणेचे काम करणार आहे. सुमित हा मूळचा हरयाणाचा आहे. तो सात वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे एका आजाराने निधन झाले.
Our athletes continue to shine at the #Paralympics! The nation is proud of Sumit Antil’s record-breaking performance in the Paralympics.
Congratulations Sumit for winning the prestigious Gold medal. Wishing you all the best for the future.— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2021
भारताला एकूण किती पदके?
भारताकडे एकूण पदकांची संख्या सात झाली आहे, जी या स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. स्टार खेळाडू आणि दोन वेळा सुवर्णपदक विजेता देवेंद्र झाझारियाने भालाफेकमध्ये रौप्यपदक पटकावले. भालाफेकमध्येच सुंदरसिंह गुर्जरने कांस्यपदक पटकावले. योगेश कथुनियाने थाळीफेकमध्ये रौप्यपदक जिंकले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.