औरंगाबाद | आज (८ मे) पहाटे औरंगाबादजवळ मालवाहू ट्रेनखाली चिरडून १६ मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. या कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी सुन्न करणारी असल्याच्या भावना व्यक्त करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे.
“औरंगाबादजवळ मालवाहू रेल्वेखाली चिरडून जालना इथल्या स्टील कंपनीत काम करणाऱ्या १५ ते १६ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी सुन्न करणारी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.” असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे. कामगारांची गावाकडे जाण्याची सोय केली जात असताना त्यांनी जीव धोक्यात घालून प्रवास करु नये, असे आवाहनही यावेळी रोहित पवारांनी मजूरांना केले आहे.
औरंगाबादजवळ मालवाहू रेल्वेखाली चिरडून जालना इथल्या स्टील कंपनीत काम करणाऱ्या १५ ते १६ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी सुन्न करणारी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.कामगारांची गावाकडे जाण्याची सोय केली जात असताना त्यांनी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, असं मी आवाहन करतो.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 8, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.