HW Marathi
Uncategorized देश / विदेश राजकारण

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ५० कोटी लोकांची कोरोना चाचणी मोफत होणार

नवी दिल्ली |  कोरोनाचे जाळे देशभरात घट्ट पकड करतंच आहे. या अनुशंगाने केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने कोरोनाची चाचणी आणि उपचार हे आयुष्मान भारत योजने अंतर्गत आणणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातल्या ५० कोटी लोकांची चाचणी किंवा उपचार हे मोफत होऊ शकणार आहेत. नॅशनल हेल्थ अथॉरिटी अर्थात NHA ने यासंदर्भातली माहिती दिली आहे. या संबंधीचे ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केले आहे.

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या २००० च्या वर गेली आहे. तर आत्तापर्यंत ६५ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनापासून देशाचा कसा बचाव करता येईल आणि लोकांना कसे याच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवता येईल याकडे लक्ष देत आहेत.

Related posts

भारतीय सैन्याचे रक्त लागलेली पाकिस्तानची साखर कशी खायची

Kiran Yadav

राहुल गांधींनी मोदींना ‘जादू की झप्पी’ नव्हे, ‘झटका’ दिला | संजय राऊत 

News Desk

‘भीम आर्मी’च्या मुंबईतील कार्यक्रमाला परवानगी देण्यास पोलिसांचा नकार

News Desk