HW News Marathi
Uncategorized

बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली

जोधपूर | बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली आहे. सध्या ते राजस्थानमध्ये ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ शूटिंग करत आहेत. मुंबईतून १० डॉक्टरांची टीम जोधपूरला रवाना झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून ते जोधपूरमध्ये शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. बच्चन यांना नेमके काय झाले यांची माहिती अद्यापही मिळाली नाही.

यावेळी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे स्थानिक डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. सध्या अमिताभ बच्चन हे जोधपूर मधील अजित महल या हॉटेलमध्ये आहेत. पंधरा दिवसापूर्वी बच्चन यांची प्रकृती बिघडल्यामुळे लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. पण, त्यानंतर ती नियमित तपासणी असल्याचे सांगण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई, माझा तुझ्यावर भरोसा हाय, मलिष्काचा महापालिकेला पुन्हा फटका

News Desk

#ExitpollMaharashtra : जाणून घ्या…राज्यात कोणाची सत्ता येणार

News Desk

धनंजय मुंडेंच्या हस्ते ‘ई-ऊसतोड कल्याण’ अँपचे बीड येथे लोकार्पण

News Desk