HW News Marathi
Uncategorized

कोणतीही पुर्वकल्पना न देता केंद्राने हटवली शरद पवारांची सुरक्षा

नवी दिल्ली | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतल्या निवासस्थानातील सुरक्षा हटवण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक कमी करण्याबाबतची कोणतीही पुर्वकल्पना न देत केंद्रीय गृहखात्याने ही सुरक्षा हटवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यात आला असून केंद्र सरकारने जाणुनबुजून शरद पवारांची सुरक्षा कमी केल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सुरक्षा काढली म्हणून शरद पवार घराबाहेर पडणार नाहीत का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात शरद पवार यांना Z security आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी सहा जनपथला तीन गार्ड शिफ्टमध्ये काम करत होते तसेच एक PSO देखील होता. पण २० जानेवारीपासून सुरक्षा रक्षक ड्युटी वर आले नाहीत तेव्हा सुरक्षा कमी करण्यात आल्याचे लक्षात आले. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर शरद पवार यांची दिल्लीतील सुरक्षा हटवली? असा चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

केंद्र सरकारने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचीही स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) सुरक्षा काढून घेत त्यांना आता ‘झेड प्लस’ सुरक्षा म्हणजेच सीआरपीएफचं सुरक्षाकवच देण्यात येणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरने सुरक्षाव्यवस्थेमधील कपातीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. सचिन तेंडुलकर यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येत होती. कोणत्याही मोठ्या व्यक्तीला दिली जाणारी सुरक्षा कायम स्वरुपाची नसते. वेळोवेळी त्याचा आढावा घेऊन सुरक्षेची श्रेणी बदलण्याचा अधिकार राज्य पोलिस प्रशासनाकडे असतो. त्यानुसार सचिनच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. मात्र ही सुरक्षा कायम ठेवावी, अशी विनंतीही सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राज्यपाल’ पदाची गरज उरली आहे का?

Manasi Devkar

राजीव गांधींमुळेच मी आज जिवंत – अटलबिहारी वाजपेयी | Rajiv Gandhi | Atal Bihari Vajpayee | Congress | BJP

Gauri Tilekar

Chandrakant patil Vs Balasaheb Thorat | भाजप आणि कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली..

Arati More