HW News Marathi
Uncategorized

‘कान्होजी आंग्रे’ यांची शौर्यगाथा सांगणार चित्ररथ राजपथावर नाही, ‘या’ ठिकाणी झळकणार

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनामित्ताने दिल्लीच्या राजपथावरील संचलनात केंद्राने महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारला आहे. यामुळे यंदाच्या प्रजासत्ताकच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नसल्याची कळताच राज्यातील दिग्गज नेते आणि जनतेने नाराजी व्यक्त केली होती. हा नाकारलेला चित्ररथ आता ठाकरे सरकारने केला असून प्रजासत्ताक दिनी मुंबईतील शिवाजी पार्क येथील संचलनातमहाराष्ट्राचा स्वराज्याचे सरखेल दर्यासारंग- कान्होजी आंग्रेया विषयावरील चित्ररथ सहभागी होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदाच समुद्र सैनिकांची तुकडी निर्माण केली. छत्रपतींच्या या आरमार उभारणीत अनेक वीरांनी योगदान दिले त्यापैकी एक म्हणजे “कान्होजी आंग्रे” आहे. आंग्रेंच्या या शौर्यागाथा इतिहास उलगडून सांगणार हा चित्ररथ आहे. चित्ररथातून स्वराज्याची सेवा करताना कान्होजींच्या नेतृत्वाखाली सागरामध्ये स्वराज्याचे भगवे तोरण कसे दिमाखाने चढले, फडकू लागले, त्यांनी इंग्रज, डच आणि फ्रेंच यांच्यावर समुद्रावरून कसे नियंत्रण ठेवले, याची शौर्यगाथा उलगडून सांगितली जाईल.

सुरतपासून कोचीनपर्यंत पसरलेल्या अथांग दर्याचा सेनापती, मराठा साम्राज्याचा पहिला नौसेनापती म्हणून अतिशय धोरणीपणाने आणि मुत्सद्देगिरीने त्यांनी ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी सागरी तटावर काम केले. कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, याठिकाणी सुधारित जहाज बांधणी, शस्त्रनिर्मितीची भरीव कामगिरी केली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात गळीत हंगामाला सुरुवात, दीडशे कारखान्यांना परवाना

News Desk

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Nandurbar | नंदुरबार मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

कॉंग्रेसच्या तब्बल १२० नेत्यांचे राजीनामे…

News Desk