HW Marathi
Uncategorized महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ३ दिवसांच्या खासगी दौऱ्यावर

uddhav thackeray

महाबळेश्वर | गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या महाविकास आघाडीच्या सत्तासंघर्ष नाट्यामध्ये अनेक नेत्यांची झोप उडाली होती. सत्तेच्या या खेळात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष होते. आणि अखेर या खेळात फटकेबाजी करत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीने भाजप सरकारवर मात करत राज्याची सत्ता हाती घेतली. तसेत पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून ठाकरे घराण्यातील व्यक्ती पदावर आली. शिवसेना पक्षप्रमुखाची जबाबदारी सांभाळत उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले.

मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यापासून उद्धव ठाकरेंची प्रशासकीय धावपळ सुरु असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. बैठका, उद्घाटन, दौरे अशा विविध कार्यक्रमांतून वेळ काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून (३१ जानेवारी) तीन दिवसांसाठी महाबळेश्वरला खासगी दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा मुक्काम महाबळेश्वर येथे असून राजभवन या शासकीय निवासस्थानी ते राहणार आहेत. वेण्णालेक पठारावर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरणार असून त्यादृष्टीने प्रशासनानेही तयारी केली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध विभागाचे उच्चस्तरीय अधिकारी आणि १०० हून अधिक पोलीस कर्मचारी याठिकाणी दाखल झालेत. आमदार भास्कर जाधव यांच्या मुलीचा विवाह महाबळेश्वर येथील कीज रिसॉर्टमध्ये १ फेब्रुवारीला होणार असून या विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाबळेश्वर दौऱ्यावर असल्याने प्रशासनाची धावपळ सुरु झाली असून पोलीस प्रशासन, पालिका, महसूल, बांधकाम विभागासह सर्वच यंत्रणा वेगाने कामाला लागल्या आहेत.

मुख्यमंत्री प्रवास करणारे हेलिकॉप्टर सहा आसनी असल्याकारणाने त्याचा आकारही मोठा आहे आणि त्यामुळेच हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जागा शोधण्याची कसरत प्रशासनाला करावी लागली. वनविभागाकडून गेल्या अनेक वर्षापासून पोलो मैदानावर हेलिकॉप्टर उतरण्यास बंदी केल्याने जागेची मोठी अडचण झाली. २९ जानेवारीला सायंकाळी वेण्णालेक येथील पठारासह महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर असलेल्या वेलोसिटीमधीलही जागेची पाहणी करण्यात आली. अखेर वेण्णालेक पठारावर हेलिकॉप्टर उतरण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. उद्धव ठाकरे कुटुंबीयांसमवेत अनेकदा महाबळेश्वर दौऱ्यावर जात असतात. यापूर्वीही शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे उद्योगपती अविनाश भोसले यांच्या फोरऑक्स बंगल्यावर मुक्कामी असत. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांचेही महाबळेश्वरवर विशेष प्रेम आहे.

Related posts

मुख्यमंत्री उद्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर, सांगलीचा दौरा करणार

News Desk

उद्धवसाहेब ‘हा’ खेकडा तर शिवसेना पोखरत आहे !

News Desk

अभिनेत्री शर्लिन चोप्राचे हॉट फोटोज सोशल मीडियावर वायरल

News Desk