HW News Marathi
Uncategorized

वेडा खेळ.. एकुलत्या एक मुलाचा घेतला बळी

हिसारः सर्वोच्च न्यायालयाने ज्या खेळाची दखल घेऊन राज्यांना उपाययोजना आखण्याचे आदेश दिले आहेत, त्या ब्लू व्हेल गेमने आणखी एका मुलाचा बळी घेतला आहे. विशेष म्हणजे लहान मुले या खेळा मग्न होतातच परतु सिरसा जिल्ह्यात एका २५ वर्षीय युवकाचा ब्ल्यू व्हेलमुळे जीव गेला आहे. गुरुवारी रात्री एका धरणात बुडून या युवकाचा मृत्यू झाला. आधी हा अपघात आहे, असं सर्वांना वाटलं पण त्याच्या मृत्यूच्या तीन दिवसांनंतर हा अपघात नसून आत्महत्या असल्याचं पुढे आलं आहे.

योगेश ऊर्फ जिम्मी सिंगला असे या युवकाचे नाव आहे. तो चंदीगढला शिकत होता. गेले काही दिवस तो खूप चिंताग्रस्त होता. त्यामागचं कारण ब्ल्यू व्हेल गेम होतं. कुटुंबीयांना याबाबतची कुठलीच माहिती नव्हती. गुरुवारी तो मौजगढमधील भाक्रा धरणाजवळ पोहोचला आणि त्याने आपल्या वडीलांना सुरेंद्र सिंगला यांना फोन लावून सांगितले की तो धरणात उडी मारणार आहे. तो आत्महत्येचा इशारा देत असल्याचं तिथे जवळ उभ्या असलेल्या लोकांनी ऐकलं आणि ते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार, तोच त्याने धरणात उडी घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Karuna Sharma यांच्या बाजूने पंकजा मुंडे सरसावल्या, Dhananjay Munde यांच्यावरती कडाडून टिका !

News Desk

मुंबई हल्ल्यामुळे आमची इज्जत गेली: पाक

News Desk

समाजाला अनिश्चित काळासाठी बंद करुन ठेवणार का? चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला सवाल!

Ruchita Chowdhary