HW News Marathi
Uncategorized

बापावर मुलीने हात उचलला म्हणून मुलीने असे काही केले, मी सर्वांवर खूप प्रेम करते मला माफ करा,मी मेल्यावर सर्व काही ठीक होईल

भोपाळ शहरात एका 23 वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ती आत्महत्या करण्यामागचे कारण मात्र सर्वांना हैरान करून सोडणारी आहे. ऐश्वर्या पराडकर (23) असे तरूणीचे नाव आहे. ऐश्वर्याने आत्महत्या कऱण्यापुर्वी सुसाईड नोट लिहीली होती.

शुक्रवारी रात्री ऐश्वर्याच्या घरी काही नातेवाईक आले होते. रात्री जेवण झाल्यानंतर ऐश्वर्याचे वडील नोतेवाईकांना सोडण्यासाठी बाहेर गेले होते. त्यानंतर 11 वाजता आईने ऐश्वर्याला जेवण्यासाठी ऐश्वर्याला बोलवण्यासाठी लहान मुलगा उदितला पाठवले. उदित गेला तेव्हा रूम आतून बंद असल्याचे आढळले. उदितने दरवाजा ठोठावूनही बहिणीचा काही उत्तर येत नव्हता. त्यानंतर उदितने फटीतून खोलीत पाहिला तेव्हा त्याला ऐश्वर्याने ओढणीने गळफास घेतलेला दिसला. हे पाहुन उदितने आईला ओरडू लागला. त्याचे ओरडणे ऐकून आई आणि शेजारपाजारचे लोक धावले. दरवाजा तोडून त्यांनी ऐश्वर्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली.

सुसाईड नोट

सर्वांवर प्रेम आहे माझे मला माफ करा,रात्री जे काही घडलं ते एक अपघात होता. पप्पानी दारू प्यायली होती, त्यांनी मम्मीला शिवीगाळ केली आणि गोंदळ घालू लागले. यावेळी माझा संयम सुटला. मी चुकिने त्यांच्यावर हात उचलला.ते नेहमी असेच करायचे. शेवटी हे कुठपर्यंत होणार आहे, मी असे करायला नको होते. पण झाले आता मला पप्पा जीवंत ठेवणार नाहीत.ते मला मारतील मला खुप भीती वाटतेय मला खुप मारतील. मला काहीच कळत नाही. मी जीव देऊनच सर्व काही ठीक करते. मी मेल्यावर सर्व काही ठीक होईल. मला वाटते यानंतर घरातील वातावरण बदलून जाईल . मी सर्वांवर खूप प्रेम करते मला माफ करा

ऐश्वर्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

11 वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

परदेशात भारताला पहिले विजेतेपद जिंकून देणारे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकरांचं निधन

News Desk

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे निधन

News Desk