नवी दिल्ली | लोकसभेत आज (५ जुलै) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर केले. यात सितारामन यांनी पेट्रोल-डिझेल लीटरमागे १ रुपया अतिरिक्त कर आकारण्यात येणार असल्याने महाग होणार आहे. तसेच तंबाखूवरही अतिरिक्त कर आकारण्यात येणार आहे.
FM Nirmala Sitharaman: I propose to increase special additional excise duty and road and infrastructure cess each one by 1 rupee a litre on petrol and diesel pic.twitter.com/y9DoC5IGIX
— ANI (@ANI) July 5, 2019
तसेच मोदी सरकारने बड्या नोकरदारांना जितकी कमाई असेल तितका कर कर वाढविण्यात आला आहे. २ कोटी ते ५ कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना ३ टक्के अतिरिक्त टॅक्स आकारण्यात येणार आहे. तर ५ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना ७ टक्के अतिरिक्त कर लावण्यात आला आहे. तर सामान्य नोकरदारांना दिलासा मिळाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.