HW News Marathi
Uncategorized

गुगलचा पिक्सल 2 येणार बाजारात

नवी दिल्ली- स्मार्टफोनच्या जागतिक बाजारपेठेत सध्या उच्च श्रेणी प्रकारातील फोनला मोठी मागणी आहे. काही आघाडीच्या कंपन्या यात आघाडीवर आहेत. काही दिवसांपूर्वी सॅमसंगने गॅलेक्सी नोट ८ हे मॉडेल सादर केल्यानंतर अ‍ॅपल कंपनीने आयफोनचे तीन नवीन मॉडेल्स लाँच केले आहेत. या पाठोपाठ आता गुगल कंपनीनेदेखील या स्पर्धेत उडी घेण्याचे संकेत दिले आहेत. गुगल कंपनी ४ ऑक्टोबर रोजी पिक्सल्स २ व पिक्सल्स २ एक्सएल हे दोन मॉडेल सादर करणार असून याचा युट्युबवरील एका व्हिडीओच्या माध्यमातून टिझरदेखील जारी करण्यात आला आहे. यात गुगलच्या सर्च बारमध्ये स्मार्टफोनबाबत विविध प्रश्‍नांना दर्शविण्यात आले आहेत. यात स्मार्टफोनची बॅटरी, स्टोअरेज, ऑटो अपडेट, कॅमेर्‍यातून काढलेल्या प्रतिमांची क्वॉलिटी आदींना अधोरेखित करण्यात आले आहे. व्हिडीओच्या शेवटी ४ ऑक्टोबर ही दिनांक दर्शविण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वारातीमविची एम.फिल. प्रवेशपूर्व परीक्षा ५ मार्चला

News Desk

बारावा वाढदिवस साजरा केला, तोच ठरला चौघांचा अखेरचा दिवस

News Desk

“शाळा सुरु झाल्यानंतरही शालेय साहित्य उपलब्ध होऊ शकले नाही,” नितेश राणेंचे पालिका आयुक्तांना पत्र

News Desk