HW News Marathi
Uncategorized

कोपर्डी खटल्याची आज सुनावणी

अहमदनगर : कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाची आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील आरोपींना सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी या खटल्याचे काम पाहिले. आज या खटल्याचा निकाल दिला जाण्याची शक्यता असुन या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. या बलात्कार आणि खुन प्रकरणात आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे यांना अटक करण्यात आली होती. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याच्याविरुद्ध बलात्कार, खून याबरोबरच पॉस्को कायद्याअंतर्गत दोष ठेवण्यात आले आहे. इतर दोन आरोपींविरोधात छेडछाड, संगमनताने कट रचण्याच दोष ठेवण्यात आला आहे. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील उज्वल निकम पाहत आहेत.

काय आहे प्रकरण ?

नगरच्या कोपर्डीगावात नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खुन करण्यात आला होता. या घटनेमुळे सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, पीडित मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यभर मोर्चे काढण्यात आले होते. राजकीय, सामाजिक स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकमध्ये एसटी रिक्षा-बसचा भीषण अपघात, मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत

News Desk

संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत सुनावली ED कोठडी

Aprna

भारताला मिळाला अजून एक ‘गोल्डन बॉय’! भाला फेकीत सुमित अंतिलला सुवर्ण पदक

Jui Jadhav