HW News Marathi
Uncategorized

‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्यांचे तोंड मात्र काळे झाले !

मुंबई। ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाच्या भिंतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याने राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून सत्ता संघर्ष निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत नवा घरोबा करत राज्यात महाविकासआघाडीचे नवे सत्ता समीकरण उदयास आले.

दरम्यान, युतीला बहुमत मिळाले असून देखील राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहून ही खंत स्पष्ट दिसत असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या आहे. फडणवीस यांची मुलगी दीविजाच्या खोलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे.

मुख्यमंत्र्यांच निवसस्थान असलेल्या वर्षा बंगल्यामधील भितींवर उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ज्याने कोणी मजकूर लिहले आहे त्यांच तोंड काळे झाले आहे असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता.

वर्षा बंगल्याच्या भिंतीवर काय लिहिले

वर्षा बंगलाच्या भिंतींवर देवेंद्र फडणवीस रॉक्स असे लिहण्यात आले आहे. तसेच हू इज यू टी म्हणजे यु टी कोण आहेत…? यू टी इज मीन म्हणजे यू टी वाईट आहेत. ‘यूटी’ म्हणजे नेमके कोण?; यावरून आता चर्चा सुरू झाल्या आहेत. तरी उद्धव ठाकरे यांच्या नावाचे इंग्रजीतील संक्षिप्त रूप ‘यूटी’ असे होते. त्यामुळे हे त्यांनाच उद्देशून असल्याचे तर्क काढले जात आहे. मात्र, ते नेमके कोणी लिहिले आहे, व्हिडिओ कोणी चित्रण केला आहे, याबाबत मात्र कोणतीही सध्या माहिती समोर आलेली नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे !

News Desk

“काँग्रेसला दूर ठेवून कोणतीही आघाडी होत असेल तर ते योग्य नाही!” – राऊत

News Desk

शंभर रुपयांत दिवाळीनिमित्त शिधा संच, योजनेत गौडबंगाल – Ajit Pawar

News Desk