HW News Marathi
Uncategorized

मी भाजपात समाधानी आहे !

मुंबई | हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन दीर्घकाळ चर्चा केल्याने हर्षवर्धन पाटील हे शिवसेनेचे शिवबंधन बांधणार ही बातमी इंदापूर तालुक्यात पसरू लागली परंतु ही अफवा असल्याचे मत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट ही साखर उद्योग व अडचणींबाबत घेतल्याचे सांगितले आहे. मुंबई मध्ये सहयाद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री व हर्षवर्धन पाटील यांची भेट झाली होती यावरून पुणे जिल्ह्यात ही बातमी कळताच हर्षवर्धन पाटील शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले.

१९९५ च्या युती सरकारमध्ये अपक्ष असणारे हर्षवर्धन पाटील हे शिवसेना कोट्यातून राज्यमंत्री झाले होते त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे मातोश्रीवर येणे जाणे आहे. परंतु हर्षवर्धन पाटील यांनी यास नकार दिला असून साखर उद्योग कामासंदर्भात ‘आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली तसेच आपण भाजप मध्ये समाधानी आहोत’, असे स्पष्टपणे सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शंभर रुपयांत दिवाळीनिमित्त शिधा संच, योजनेत गौडबंगाल – Ajit Pawar

News Desk

कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहेच शिवाय हतबलही झालेय – नवाब मलिक

News Desk

गुजरात विधानसभेसाठी भाजपची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

News Desk