HW News Marathi
Uncategorized

मला दिल्लीत इंटरेस्ट नव्हता ,राज्यसभेवरून संजय काकडेंचा यु-टर्न!

पुणे | भाजपने आपल्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ३ जागांसाठी उमेदवार जाहीर केले. यामध्ये पुण्याचे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. संजय काकडे यांनी वेळोवेळी राज्यसभेवर जाण्याची आपली इच्छा बोलून दाखवली होती. मात्र आता उमेदवारी मिळाली नाही म्हटल्यावर त्यांनी यु-टर्न घेतला आहे. माझं मन दिल्लीत रमत नाही,मला महाराष्ट्रात काम करायचं आहे , त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही म्हणून आपण नाराज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘मला डावलण्यात आलेलं नाही. राज्यसभेवर जाण्यात मला काहीही रस नव्हता. दिल्लीत जाण्याची इच्छा नाही आणि मला तिथे करमणार नाही’ असं संजय काकडे यांनी म्हटलं आहे. मला राज्यात चांगली जबाबदारी मिळेल अशी अपेक्षा आहे. मला राज्यात काम करायला आवडेल. जी जबाबदारी मिळेल ती स्वीकारायला तयार आहे. आठ ते दहा जण इच्छुक होते, मीही सहयोगी होतो. त्यामुळे पक्षाने जुन्या कार्यकर्त्याला संधी देण्यात येत आहे. असं मला पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. दुःख याचं आहे की एकनाथ खडसेंना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यांना द्यायला हवी, त्यांच्यावर अन्याय झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘नाणार’ प्रकल्प रद्द केल्यामुळे प्रमोद जठार देणार भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

News Desk

मी पवार आणि राष्ट्रवादीसोबतचं…मोहिते-पाटलांचे घुमजाव !

News Desk

समाजाला अनिश्चित काळासाठी बंद करुन ठेवणार का? चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला सवाल!

Ruchita Chowdhary