HW News Marathi
Uncategorized

पुण्यातील काही भाग पुर्णपेणे सील करण्याचा महापालिकेचा निर्णय

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या अपेक्षेपेक्षा वाढत असल्याकारणाने सरकार आता आणखी कठोर पावले उचलताना दिसत आहे. पुण्यातील काही भाग पुर्णपणे सील करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याची माहिती पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. आज (६ एप्रिल) रात्री १२ वाजल्यापासून पुण्यातील कोंढवा, गुलटेकडी ते आरटीओ ऑफिस, सर्व पेठाचा भाग सील करण्यात येणार आहे. सील केलेल्या भागामध्ये लोकांना विनाकारण ये-जा करण्यास सक्तीने मनाई करण्यात आली असून फक्त जीनवावश्यक वस्तूंसाठीच घराबाहेर पडण्यात येणार आहे.

पुण्यात ज्या भागात सील करण्यात येणार आहे तिथे ३७ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. लोकांना वारंवार रस्त्यावर येण्यास मज्जाव करुनही ऐकत नसल्याकारणाने ही कठोर पावले पालिकेने उचलली आहेत. देशात सध्या २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे मात्र, पुण्यात गेल्या ४ दिवसांमध्ये रोज १० च्या पुढे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तसेच, पुण्यातील झोपडपट्टीतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.वसांमध्ये रोज १० च्या पुणून तांची सं

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी पवार आणि राष्ट्रवादीसोबतचं…मोहिते-पाटलांचे घुमजाव !

News Desk

Budget 2019 : सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसह घर खरेदीमध्ये दिली ऐवढी सूट

News Desk

मोबाइलवर 24 तास गेम खेळल्याने आले अंधत्व

News Desk