HW News Marathi
Uncategorized

जालन्यातील तरुण-तरुणीच्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल, ६ आरोपी अटकेत

जालना | जालन्यात आज (३१ जानेवारी) एक तरुण-तरुणीला काही मुलांच्या घोळक्याने मारहाण केली इतकेच नव्हे तर तरुणीचा विनयभंग करतानाचा व्हिडीओही व्हायरल करण्यात आला. दरम्यान, या तरुणांना मारहाण करणाऱ्यांपैकी ६ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मुलांच्या घोळक्याने दोघांना पकडले असून तरुणीला फरफटत झाडीत नेताना दिसत आहे आणि तिच्या सोबतचा तरुण त्या सगळ्यांच्या पाया पडताना दिसत आहे. या ठिकाणी कसे आलात असं त्या दोघांना विचारले असता इथे तळे आहे त्यामुळे फिरायला आलो असं कारण त्या तरुणाने मुलांना दिले.

ही गंभीर घटना असून आरोपींचा शोध लावून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी केले होते. दरम्यान, मुख्मंत्री उद्धव ठाकरेंनीही या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत पोलीसांनी केलेल्या हलगर्जीपणा ही निर्दशनास आणला तसेच याबाबत पोलीस अधीक्षकांमार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी असंही देसाई म्हणाले होते. या तरुण-तरुणीचा हा व्हिडिओ २९ जानेवारीला चित्रित करण्यात आला होता असं म्हटलं जातंय. एका मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त देत हा व्हिडिओ दाखवला आहे. त्यानंतर पोलिसांनी पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वारातीमविची एम.फिल. प्रवेशपूर्व परीक्षा ५ मार्चला

News Desk

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी टास्क फोर्सची निर्मिती!

News Desk

पन्नास हजारात खरेदी केलेल्या तरूणीवर बाबाचा आठ महिने बलात्कार

News Desk