HW News Marathi
Uncategorized

मदत कार्यावर चेष्टा करणाऱ्यांना आव्हाडांचे सडेतोड उत्तर

मुंबई | कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वॉरंटाईन केले आहे. कोरोना झालेल्या पोलीसांच्या संपर्कात आल्याने आव्हाडांनी खबरदारी म्हणून हे पाऊल उचलले होते. पण त्यावरुन अनेक टीका व्हायला लागल्या. कोरोनाच्या काळात आव्हाड जी मदत करत आहेत त्या कार्याची चेष्टा करणाऱ्यांना आव्हाडांनी सडतोड उत्तर दिले आहे. ‘कुचाळक्या थांबवा, चाचण्या वाढवा’ असा सल्ला दिला आहे. माझ्या सतत संपर्कात असणारी एक व्यक्ती कोरोनाबाधित आहे हे कळल्यानंतर मी स्वतः डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार क्वॉरंटाईनमध्ये गेलो. माझी चाचणी निगेटिव्ह आली असली, तरी मी ७ दिवसांनी होणाऱ्या दुसऱ्या चाचणीपर्यंत आणि त्यानंतर डॉक्टरांनी अनुमती देईपर्यंत घराबाहेर पडणार नाही, असेही त्यांनी यावेळी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Shinde यांना जीवे मारण्याची धमकी; गुप्तचर विभागाला माहिती

Seema Adhe

दंगल किंवा युद्ध करून भाजपचा निवडणुका जिंकण्याचा डाव- राज ठाकरे यांची टीका

News Desk

बी.फार्म करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका तत्वावर मेडिकल दुकानात काम करता येणार

News Desk