HW News Marathi
Uncategorized

कोल्हापूरत अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हत्या

बर्कत अली

कोल्हापुर येथील मरळी गावातील प्रदीप सरदार सुतार ९ वर्याषाच्या मुलाचे नातेवाईकाने केला हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी 48 तास शोध घेतल्यानंतर मुलाचे मृतदेह इराणी खांणीत तरंगताना आढळला आहे. याप्रकऱणी मुलाच्या घरच्यांनी त्यांच्या नातेवाईकावर गुन्हा नोंदवला आहे. प्रकाश बंडा लोहार असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी प्रकाशला अटक केली आहे.

पन्हाळा तालुक्यातील मरळी गांव येथे इयत्ता तिसरीत शिकणा-या प्रदीप सरदार सुतार (वय ९, मरळी-कळे, ता. पन्हाळा) या शाळकरी लहान मुलाचे अपहरण करून त्याचा खून केल्याचे निष्पन झाले. या मुलाचे अपहरण नातेवाईकांनीच केल्याचा संशय खरा ठरला असून याबाबत संशयीत म्हणून अटक केलेल्या विशाल उर्फ प्रकाश बंडा लोहार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी संध्याकाळपासून प्रदीप घरी परतला नसल्यानेे घरातील नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता तो विशल बरोबर मरळी फाटा येथे जात असल्याचे समजले होते. यानंतर मुलगा हा रंकाळा बसस्थानकावरून निघून गेला असल्याचे संशयित विशालने नातेवाईकाना सांगितले होते. पण विशालच्या सतत बदलणा-या उत्तरामुळे त्याच्यावरच नातेवाईकांनी संशय घेतला. पोलिसांची सतत दिशाभुल करू लागल्याने पोलिसांनी त्याला आपला खाक्या दाखविताच आरोपीने प्रदीपला रंकाळ्याजवळ खणीत टाकल्याचे सांगितले.

पोलीस त्याचा दिवसभर शोध घेत असता ५ वाजता त्याचा मृतदेह इराणी खाणीत आढळून आला. याबाबत विशाल लोहार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जुना राजवाडा पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शहीदांच्या कुटुंबाला आर्थिक मदत तर एका व्यक्तीला सरकारी नोकरी

News Desk

“सुशांतसिंगची आत्महत्या नव्हती तर मग हत्यारा कोण हे सीबीआयने सांगावे…”, राष्ट्रवादीची मागणी

News Desk

कोरोनामुक्त धनंजय मुंडेंचं वर्क फ्राॅम होम सुरू , होम क्वारंटाईन असलो तरी काम थांबत नाहीत !

Arati More