HW News Marathi
Uncategorized

आज मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी होणार

नवी दिल्ली | ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठ देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ज्योतिरादित्य शिंदेंसह २२ आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार अल्पमतात आले. या पार्श्वभूमीवर आज (१६ मार्च) बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मध्य प्रदेशात आजपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विश्वादर्शक ठराव मांडण्यात येणार आहे.

ज्योतिरादित्य शिंदेंसोबत २२ आमदारांनी राजीनामे दिले. यानंतर मध्य प्रदेशाच्या विधानसभा अध्यक्षांनी ६ आमदारांचा राजीनामा अध्यक्षांनी स्वीकारला आहे. हे सर्व आमदार ज्योतिरादित्य शिंदेचे समर्थक असून त्यांनी काँग्रेसमध्ये परतण्यास नकार दिला. हे सर्व आमदार कमलनाथ सरकारमध्ये मंत्री होते. कमलनाथ यांच्या शिफारशीनंतर शनिवारी (१४ मार्च) राज्यपालांनी पदावरुन त्यांची हकालपट्टी केली.

दरम्यान, भाजपचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, भाजप नेते गोपाल हे कमलनाथ सरकारवर लक्ष ठेवून आहेत. राज्यामध्ये विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जावा, ही भाजपची आधीपासूनची मागणी होती. मात्र, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह काँग्रेसच्या काही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले. यामुळे भाजपच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्याच्या चर्चा मध्य प्रदेशमध्ये बोल्या जात आहेत.

मध्य प्रदेशाची विधानसभेचे सभागृहातील एकूण आमदारांची संख्या २०६ असून आणि बहुमतासाठी १०४ आमदारांना पाठिंबा गरजेचा आहे. परंतु या परिस्थितीत कॉंग्रेसकडे केवळ ९२ आमदार शिल्लक राहतील आणि बिगर-भाजपा आणि बिगर-कॉंग्रेसच्या आमदारांच्या पाठिंब्यानंतर ही संख्या ९९ वर पोहचेली. अशा परिस्थितीत भाजप सहजपणे सरकार स्थापन करेल, कारण विधानसभेत भाजपाला १०७ आमदारांचा पाठिंबा आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

म्हणून मुलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी

News Desk

अजित पवारांवर वेब सीरिज केल्यास ३०० कोटी रॉयल्टी मिळेल, सोमय्यांची खोचक टीका

News Desk

“काल परवाच नवाब मलिकांचे पुतळे जाळण्याचा कार्यक्रम आपण दिला”, चंद्रकांत पाटलांच वादग्रस्त वक्तव्य!

News Desk