HW News Marathi
Uncategorized

#NirbhayaCase : राष्ट्रपतींनी आरोपीचा दयेचा अर्ज फेटाळला, फाशीचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली | निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पटियाला हाऊस न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर एक दोषी मुकेश सिंह याने तिहार तुरुंगातून राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने आरोपीचा दयेची याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल (१७ जानेवारी) फेटाळून लावली. यामुळे आता निर्भयाच्या आरोपींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रकरणी आरोपीच्या दयेच्या याचिकेनंतर त्यांच्या फाशीच्या निर्णयाला ‘स्टे’ मिळाला होती. यामुळे निर्भयाच्या आरोपींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फाशी दिली जाणार नाही. मात्र, राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर आता निर्भयाच्या आरोपींना न्यायालयाने निश्चित केलेल्या तारखेला फाशी होणार, की न्यायालयाकडून फाशीसाठी नवी तारीख देणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

गेल्याच आठवड्यात दोषी अक्षय ठाकूर (३१), पवन गुप्ता (२५), मुकेश सिंह (३२) आणि विनय शर्मा (२६) यांचे डेथ वॉरंट जारी केले होते. यानंतर दोषी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह या दोन्ही आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या दोन्ही आरोपींच्या पुनर्विचार याचिकेवर मंगळवारी (१४ जानेवारी) न्यायालयात न्या. एन. व्ही. रमण्णा, न्या. अरुण मिश्रा, आर. एफ. नरीमन, आर. भानुमती, न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने एकमताने आरोपींची याचिका फेटाळून लावली.

१६ डिसेंबरची ती काळरात्र

१६ डिसेंबर २०१२च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरु झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. मात्र, आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. तसेच तिला अमानुष मारहाणही केली. त्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Uddhav Thackeray यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे” – Devendra Fadnavis

News Desk

Budget 2019 : पेट्रोल-डिझेल लीटरमागे १ रुपयांनी महागणार

News Desk

 मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही !

News Desk