HW Marathi
Uncategorized महाराष्ट्र राजकारण

राष्ट्रवादीच्या धनराज महालेंची शिवसेनेत घरवापसी

मुंबई- शिवसेनेने राष्ट्रवादीला विधानसभेच्या पार्श्वभूमिवर जोरदार हादरे दिले आहेत. आज दिंडोरी मतदार संघातील राष्ट्रवादीचे धनराज महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. महाले यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले होते.  मात्र लोकसभेला दारूण पराभव झाल्यानंतर धनराज महाले यांनी पुन्हा शिवसेनेची वाट धरली आहे.

धनराज महाले हे राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे होते. दरम्यान लोकसभा निवडणुकांसाठी पूर्वी शिवसेनेचे माजी आमदार असलेल्या महालेंनी लोकसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.आणि त्याचवेळी राष्ट्रवादीच्या भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आणि या दोघांमध्ये भारती पवार विजयी झाल्या.

आता पुन्हा शिवसेनेत प्रवेश केल्याने राखीव मतदारसंघाची गणिते बदलणार आहे. सध्या सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात दुसऱ्या पक्षातून येण्याचे प्रमाण वाढले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेश होत असल्याचे दिसून येत आहे.

Related posts

लातूरच्या पाण्यासाठी आमिरने केले श्रमदान

News Desk

नाशिक महापालिकेच्या दोन्ही अतिरिक्त आयुक्तांचा बदलीसाठी विनंती अर्ज

News Desk

मोदी तुमच्या पापाचा घडा भरला आहे | नवाब मलिक

News Desk