मुंबई | सध्या देश हा ‘कोरोना’ व्हायरससारख्या संकटाला मात देत आहेत. अशा काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार-खासदार हे त्यांचे एका महिन्याचे वेतन राज्य आणि केंद्राच्या सहाय्यता निधीला देणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. “देशातील या अभूतपूर्व संकटात राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसोबत ठाम उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य व केंद्राच्या सदर सहायता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळ सदस्यांचे एक महिन्याचे वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी व संसदेतील सदस्यांचे एक महिन्याचे वेतन ‘प्रधानमंत्री सहाय्यता निधी’ला देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे”, अशी घोषणा शरद पवार यांनी केली आहे.
या अभूतपूर्व संकटात @NCPspeaks जनतेसोबत ठाम उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य व केंद्राच्या सदर सहायता कार्यास हातभार लागावा या हेतूने…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 26, 2020
राज्य विधिमंडळ सदस्यांचे एक महिन्याचे वेतन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी व संसदेतील सदस्यांचे एक महिन्याचे वेतन 'प्रधानमंत्री सहाय्यता निधी'ला देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. सदस्यांना कळविण्यात येते की सदर धनादेश प्रदेशाध्यक्ष श्री. @Jayant_R_Patil यांचेकडे जमा करावेत.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 26, 2020
“कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. ह्या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे”, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान सदस्यांनी सदर धनादेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जमा करावेत असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले आहे. कोरोनाच्या या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला आर्थिक चणचण जाणवू शकते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने हे पाऊल उचलेले जात आहे. त्याचप्रमाणे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच (२६ मार्च) १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.