HW News Marathi
Uncategorized

मुंबई काँग्रेसला बुडवण्यासाठी निरूपम यांचा हातभार

मुंबई – मुंबई काँग्रेसला सध्या झालंय काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांनी सध्या ट्विटरवर जीएसटीविरोधात आंदोलन सुरू केलंय. सुचेता दलाल यांनी व्यक्त केलेल्या मताला जनमत बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. संजय निरूपम यांनी बीग बी अमिताभ बच्चन यांनाही जीएसटीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, त्याकडेही बच्चन यांनी दुर्लक्ष केल्यानं निरूपम यांचा भ्रमनिरास झालाय. त्यामुळं आता निरूपम यांनी ट्विटरबाजीला सुरूवात केलीय.

मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेससाठी निरूपम हे अडचणीचे ठरत आहेत. (निरूपम यांच्या विशेष प्रयत्नांशिवायही काँग्रेसच्या अडचणी वाढतच आहेत) मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्यापासून ते मोबीलायझेशन आणि संघटनात्मक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, नेतृत्वगुण आणि मनुष्यबळाच्या नियोजनात निरूपम हे सपशेल फेल ठरलेले आहेत.

निष्ठावान गुरूदास कामतांचा पत्ता कट

पक्षाचे निष्ठावान आणि ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांच्यारूपानं काँग्रेसला सगळ्यात मोठं नुकसान झालंय, तेही निरूपम यांच्या नियुक्तीनंतर. निरूपम यांच्या नियुक्तीला कामत यांचा सुरूवातीपासूनच विरोध होता. मात्र, पक्षानं कामत यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळं तीन दशकांपासून पक्षासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या कामत यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती पत्करली. नेहमीप्रमाणे यावेळीही काँग्रेसचे वरिष्ठ मुंबई काँग्रेसमधल्या या घडामोडींपासून अलिप्तच राहिले. निरूपम यांच्या कार्यशैलीमुळंच कृष्णा हेगडे हे भाजपमध्ये गेल्याचा आरोप कामत यांनी केलाय. काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना संजय निरूपम आणि राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्या शैलीला कंटाळून काँग्रेस सोडावी लागत असल्याचं कामत यांनी सांगितलं.

निरूपमं यांची वादग्रस्त वक्तव्य

निरूपम यांनी काँग्रेसमध्ये येताच आपल्या वादग्रस्त वक्तव्याची गिफ्ट काँग्रेसला दिली. भाजप नेत्या आणि विद्यमान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. स्मृती या पैसे घेऊन टिव्ही चॅनेल्सवर नाचतात, आणि नंतर चॅनेल्सवर विश्लेषक म्हणून बसतात असं वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसलाच अडचणीत आणणारं वक्तव्य केलं होतं. त्यांनी पंडित नेहरूंचा फॅसिस्ट सोल्जर म्हणून काँग्रेसच्याच काँग्रेस दर्शन या मुखपत्रातील एका लेखात उल्लेख केला होता.

मुंबई महापालिकेचं दुःस्वप्न

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात पहिल्याच भाषणात त्यांनी पक्षातीलच नेत्यांना धारेवर धरलं. जर पराभूत झालो तर या पराभवाला काँग्रेसमधील जे नेते पक्षविरोधी कारवाया करत आहेत, तेच जबाबदार असतील, असं वक्तव्यं केलं होतं. निरूपम यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यातील आत्मविश्वास दिसतो, त्यामुळं निरूत्साही असलेल्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढण्यास मदत होईल असं वाटलं होतं. गेल्या तीन दशकांपासून मी मुंबई काँग्रेसची वाटचाल पाहत आहे. मात्र, अशा परिस्थितीत हतबल काँग्रेस मी कधीच पाहिली नाही, जी सध्या निरूपम यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे, असे हताश उद्गार कामत यांनी निवडणुकीनंतर काढले होते.

निरूपम यांनी मंत्रालयाजवळ एक घेराव आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनात एकही काँग्रेसचा वरिष्ठ नेता सहभागी झाला नव्हता. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यासारखे नेते या आंदोलनाकडे फिरकलेही नव्हते. विशेष म्हणजे हे सर्वजण त्यावेळी मंत्रालयाजवळील काँग्रेसच्या गांधीभवन या प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. त्यामुळं निरूपम यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला.

अपयशी नेतृत्वाची परंपरा

लोकप्रिय नसलेले, अपयशी नेत्यांच्या हाती नेतृत्व सोपवण्याचा नवा पायंडा काँग्रेसमध्ये आलाय का ? अशी शंका उपस्थित होऊ लागलीय. मग केंद्रात ते केंद्रातले राहुल गांधी असोत की मुंबईत संजय निरूपम असोत.

मी नुकतीच अशोक चव्हाण यांची Hindu World साठी मुलाखत घेतली. या मुलाखतीत निरूपम यांच्यावर विश्वास ठेवला ही चूक झाली का, असा थेट प्रश्न विचारला होता. त्यावर अशोक चव्हाण यांनी दिलेलं उत्तर काँग्रेसमधील परिस्थिती समजण्यास पुरेसं आहे. चव्हाण म्हणाले, एकदा पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला की त्याविरोधात प्रश्न विचारू शकत नाही. असो, चव्हाण साहेब आम्हांला कळालं की तुम्हांला नेमकं काय म्हणायचं आहे.

(या लेखाचे लेखक सुजीत नायर, हे Hindu world या डिजिटल मीडियाचे व्यवस्थापकीय संपादक आहेत.)

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खेळाडू दारू प्यायल्याने भारत हारला

News Desk

गुजरातमध्ये व्हीव्हीपीटी मशिन फेल

News Desk

राष्ट्रवादीच्या खासदारांनो दिल्लीला जाऊ नका ,शरद पवारांची सुचना

Arati More