HW News Marathi
Uncategorized

आमदार नितेश राणेंना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

कणकवली | मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना जबाबदार धरत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना आमदार नितेश राणेंनी चिखलाच्या पाण्याने आंघोळ घातली. या प्रकारणी नितेशवर काल (४ जुलै) गुन्हा दाखल झाला असून नितिशसह १७ जणांना अटकही करण्यात आली होती. या प्रकरणी नितेशला आज (५ जुलै) दुपारी 3 वाजता न्यायालयात हजर करण्यात आले. अखेर न्यायालयाने नितेश राणेंसह १७ जणांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर कणकवली बाजारपेठ बंद करण्यात आली आहे.

नितेश राणे आणि त्यांच्या ४० ते ५० समर्थकांवर कलम ३५३,३४२,३३२, ३२४, ३२३, १२०(ए),१४७,१४३,५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश राणेंनीही पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मात्र, पोलीस ठाण्यात गेल्यानंतर राणेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला.

नेमके काय आहे प्रकरण

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना जबाबदार धरत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी नितेश चिखलाच्या पाण्याने आंघोळ घातली. नितेश यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी शेडेकर यांना गडनदी पुलाला बांधून ठेवले होते. एवढेच नव्हे तर सर्वसामान्य जनता रोज चिखल मारा सहन करते. तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या, असे म्हणत शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या कार्यकर्त्यानी ओतल्या. कणकवलीनगरी तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असे विचारत नितेश यांच्यासह स्वाभिमान कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जानवली नदीपुलापर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांची वस्तुस्थिती दाखवली. यावेळी येत्या दोन दिवसांत सर्व्हिस मार्ग सुरक्षित करण्याचे आश्वासन प्रकाश शेडेकर यांनी दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिकांच्या जावयाशी संबंधित दोघांना समन्स, एनसीबी SIT टीम करणार चौकशी

News Desk

‘संजय राऊत विरुद्ध नितेश राणे युद्धाला पुन्हा सुरुवात!’

News Desk

‘नारायण राणे यांना अटक! हे नवे हिंदूत्त्व आणि नवा महाराष्ट्र’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

News Desk