नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेवत गप्पा करतात, ते कुठल्याही गोष्टीची खात्री न करता मोघम बोलतात, अशी टीका माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे. चिदंबरम यांच्या काश्मीरबद्दलच्या विधानावर मोदींनी टीकास्त्र सोडले होते. या टीकेला चिदंबरम यांनी प्रत्युत्तर दिले. ‘राजकोटमधील एका संवादादरम्यान मी काश्मीर प्रश्नावर भाष्य केले होते. त्यावरील मोदींची प्रतिक्रिया लक्षात घेता, त्यांनी माझे विधान पूर्ण ऐकले नाही हे लक्षात येते. काश्मीरबद्दलच्या प्रश्नावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला मी दिलेले उत्तर इंडियन एक्स्प्रेसमध्ये शब्दश: प्रसिद्ध झाले आहे. त्यातील नेमका कोणता शब्द चुकीचा आहे? मी काय चुकीचे बोललो आहे? पंतप्रधान मोदी केवळ भुताची कल्पना करुन त्यावर हल्ले करतात,’ असे चिदंबरम यांनी म्हटले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post