HW News Marathi
Uncategorized

नितीन राऊतांनी महावितरणच्या कार्यालयात क्लार्कचे काम करावे ! दरेकरांचा टोला

मुंबई | राज्यात वीजबिल सवलतीचा मुद्दा एकीकडे पेटत असताना आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महावितरणच्या कार्यालयात क्लार्कचे काम करावे. मग आम्ही त्यांच्याकडे वीजबील घेऊन तपासणीसाठी येतो”, असा प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. नितीन राऊत यांनी कालच्या (२१ नोव्हेंबर) आपल्या पत्रकार परिषदेत भाजपवर साधलेल्या निशाण्याला प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मी १०० युनिट वीज माफ देण्याच्या माझ्या भूमिकेवर आजही ठाम आहे. भाजप नेत्यांनी वाढीव विजबिले घेऊन माझ्या कार्यालयात यावे. मी चर्चा करायला तयार आहे”, असे नितीन राऊत म्हणाले होते.
“विजबिले तपासणे हे काय मंत्र्याचं काम आहे का? असे असेल तर मग नितीन राऊत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि क्लार्क म्हणून महावितरणमध्ये नोकरी पत्करावी. मग आम्ही त्यांना विजबिले घेऊन येऊ”, असे प्रवीण दरेकर म्हणाले. दरम्यान त्यापूर्वी नितीन राऊत असे म्हणाले होते की, “भाजप नेत्यांनी वीजबिल घेऊन माझ्या कार्यालयात यावे. मी त्यावर चर्चा करेन. ती सर्व विजबिले तपासून पाहिन आणि त्यात जर वाढीव वीजबिले नसतील तर भाजप नेत्यांनी वचन द्यावे की आम्ही सर्व विजबिले भरू”, असे नितीन राऊत म्हणाले होते.

नितीन राऊतांचा भाजपवर निशाणा

“माझी १०० युनिट वीज माफीची भूमिका आजही बदललेली नाही. भाजप नेत्यांनी वाढीव वीजबिल घेऊन माझ्या कार्यालयात यावे. मी चर्चा करायला तयार आहे. मात्र, यापूर्वीच्या सरकारने करून ठेवलेल्या पापांचे आधी निरसन करू आणि त्यानंतरच १०० युनिट वीजमाफी देण्याचा निर्णय घेण्यात घेऊ”, असे नितीन राऊत यांनी म्हटले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरनाथ यात्रेत अडकले महाराष्ट्रातील भाविक

News Desk

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न ” डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार ” योजना.

News Desk

Karuna Sharma केसमध्ये बीड पोलिसांची थेट मुंबईकडे झेप, Sharma यांना जामीन मिळणार ?

News Desk