HW News Marathi
Uncategorized

जगानेही मान्य केले भारतातील मोदींचे नेतृत्व, अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली | १७ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. यात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्पष्ट बहुमत मिळाले असून एनडीएला ३४० जागांवर विजयी मिळाला आहे. मोदींच्या विजयानंतर देशभरात उत्सावचे वातावरण पाहयला मिळत आहे. देशभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात राज्य आणि देशपाळीवर मोदींचा वर्षा मर्यादीत न राहता. मोदींना आतंरराष्ट्रीय पातळीवर मोदींच्या विजय घोंड दौंडचे कौतुक झाले आहे. जगभरातील इस्रायल, जापान, चीन, अफगानिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भुटान आणि राशिया या देशाच्या राष्ट्रध्यक्षांनी मोदींना फोन करून आणि ट्वीटरच्या माध्यमांतून कौतुकांचा वर्षाव केला आहे.

इस्रायलचे अध्यक्ष बेंजामिन नेत्यान्याहू यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवर “माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा !, या निकालांनी जगाला पुन्हा एकदा लोकशाही नेतृत्त्वाचे उत्तम उदाहरण असल्याचे दाकवून दिले आहे. आम्ही दोघे मिळून भारत आणि इस्त्राईलमधील मैत्रीत्वाचे अतुट नाते मजबूत करणार आहोत. खूप छान मित्रा, ट्वीट केले आहे.

चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

जपानी पंतप्रधान शिन्झो आबे यांनी देखील फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी टेलिग्राम करून नरेंद्र मोदींना शुभेच्छा पाठविल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमत मिळाले.

भूटानचा राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी देखील फोन करून मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी ट्वीट करत म्हटेल की , “अभिनंदन नरेंद्र मोदी भारतासारख्या देशाला एक ताकदवा नेतृत्व मिळाले आहे. अफगाणिस्तानची जनता ही भारतसोबतचे नाते संबंध सुधारणार असून दक्षिण आशिया देशात शांतता नांदणार आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील मोदींनी शुभेच्छा देणारे ट्वीट केले आहे. दक्षिण आशियातील देशात शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी आपण काम करूया अशी अपेक्षा करा करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Related posts

#Vidhansabha2019 | राज्यात युतीकडून रिपाईला ‘या’ ६ जागा

News Desk

राष्ट्रवादीच्या धनराज महालेंची शिवसेनेत घरवापसी

Gauri Tilekar

Dhananjay Munde | परळीमध्ये काय घडलं काय बिघडलं ?धनंजय मुंडे दोषी आहेत का ? सविस्तर रिपोर्ट

Arati More